2023 च्या वर्ल्ड कप मध्ये होणार का सूर्यकुमार यादव ची संघातून हकालपट्टी, जाणून घ्या कारण आणि BCCI ने केलेले विधान.
क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला दुय्यम स्थानी असलेला खेळ आहे. अनेक दिग्गज खेळाडू प्रत्येक देशाकडे आहेत आणि काही न मोडणारी रेकॉर्ड सुद्धा काही फलंदाजांनी बनवली आहेत.

भारतीय संघातील सूर्यकुमार यादव सध्या सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. कारण भारतीय संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव ला ओळखले जाते. तसेच सूर्यकुमार यादव ला mr.360 असे सुद्धा काही जण म्हणतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला सूर्यकुमार यादव ला भारतीय संघातून का हकालपट्टी मिळणार आहे आणि सूर्यकुमार यादव च्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळनार याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रलिया संघाबरोबर 3 वन डे सिरीज सामना खेळला गेला होता या सामन्यात 2-1 ने भारतीय संघाला हार मिळाली होती. परंतु महत्वाचे म्हणजे या 3 सामन्यात भारतीय संघाचे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हे पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. या तिन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव गोल्डन डक आऊट झाल्यामुळे फॅन्स मधून संताप व्यक्त केला जात आहे आणि सूर्यकुमार यादव ला भारतीय संघातून हकलण्याची मागणी केली जात आहे.
सूर्यकुमार यादवच्या सततच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेर ठेवण्याची मागणी फॅन्स तर्फे करण्यात आली आहे त्यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. आणि बीसीसीआयसमोर मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला संघात अचानक कोणतेही बदल करणे पसंत नाही. त्यामुळे BCCI बोर्ड मोठ्या गोंधळात सापडला आहे.
परंतु संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याची योजना असती तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळाली असती. पण असे झाले नाही. इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आला आणि त्याला एक सामना खेळायला मिळाला. पण संजू सॅमसनलाही संघात स्थान दिले जात नाही,
हे पाहता कदाचित बीसीसीआय संजू सॅमसनला संधी देणार नाही आणि सूर्यकुमार यादवलाच पुढे करता येईल. असा BCCI ने सांगितले आहे. कारण अचानक संघात बदल करणे सोपे काम नाही त्यामुळे ठरलेले खेळाडू संघात असतील असे विधान BCCI ने केले आहे.