“भाऊ, खूप सारे प्रेम, लवकरच भेटा” विराट कोहलीच्या इंस्टाग्राम स्टोरीला रिप्लाय म्हणून सूर्यकुमार यादवने शेअर केला विराटसाठी ‘खास’व्हिडीओ, सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 7 जानेवारी रोजी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने 91 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. दुसरीकडे, भारतीय संघाचा स्फोटक मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात शतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
त्याचवेळी, सूर्याने शतक झळकावल्यानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीनेही आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. ज्याबाबत सूर्याची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे

विराटच्या स्टोरीवर सूर्यकुमार यादवनी अशी प्रतिक्रिया दिली आहे
त्यानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात सूर्या स्वतःला विराटच्या गोष्टीवर पाहून हसला. सूर्याने लगेचच कथेला उत्तर दिले आणि कोहलीला सांगितले, “भाऊ, खूप सारे प्रेम, लवकरच भेटा.” त्यानंतर सूर्याने सुद्धा ‘भाई स्टोरी पर चले गए इनके” असे सांगितले. विराटच्या स्टोरीने सूर्या आनंदी आहे, हे मात्र नक्की..
टीम इंडियाचा आक्रमक मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक T20 सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले आहे. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. यादवने अवघ्या 45 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले.
सूर्याने 219.61 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 51 चेंडूत 112 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार दिसले आहेत.
पहा सूर्याने शेअर केलेला व्हिडीओ..
Raw emotions 🎦
A Suryakumar fandom frenzy 👏🏻
A special reply to an Instagram story 😉
Unparalleled love for SKY from his fans as he signs off from Rajkot 🤗#TeamIndia | #INDvSL | @surya_14kumar pic.twitter.com/wYuRKMNv1L
— BCCI (@BCCI) January 8, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: