MUM vv HYB RANAJI ROPHY LIVE: 15 चौकार 1 षटकार.. रणजी ट्रॉफीमध्येही सूर्यकुमार यादव करतोय 360 डिग्री फलंदाजी, गोलंदाजाना फोडून काढत ठोकल्या एवढ्या धावा, पहा व्हिडीओ..
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने रणजी ट्रॉफीमध्ये बॅटने कहर केला आहे. मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध झंझावाती पद्धतीने 90 धावा केल्या होत्या. त्याने क्रीजवर जाऊन टी-20 शैलीत फलंदाजी करताना 80 चेंडूत 90 धावा केल्या. यादरम्यान सूर्याने 15 चौकार आणि 1 षटकारही लगावला.
Suryakumar Yadav ahead of T20I series against Sri Lanka #IndianCricketTeam #SuryakumarYadav pic.twitter.com/TnV9IGxj0l
— Pratap Potluri (@waltairblues) December 20, 2022
पृथ्वी शॉची विकेट लवकर गमावल्यानंतर सूर्यकुमार क्रिजवर उतरला होता. यानंतर त्याने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. त्याचवेळी मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 62 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या.
📌 MUMBAI vs HYDERABAD#SuryakumarYadav is dismissed on 90(80) fours:15, six:1
Ajinkya Rahane joins Yashasvi Jaiswal [62*(96] in the middle.
Mumbai 183/2#Cricket #CricketTwitter #Ranjitrophy #ranjitrophy2022 https://t.co/0Ak8o5Ecm5
— Sarvesh🏏 (@CricAspect) December 20, 2022
रहाणे आणि जैस्वाल क्रीजवर!
मुंबई संघानेही 34 षटकात 183 धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या क्रीझवर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जयस्वाल उभे आहेत.

रणजी ट्रॉफी 2022-23 ग्रुप स्टेजचा दुसरा सामना आजपासून म्हणजेच मंगळवारपासून देशातील विविध शहरांमध्ये खेळवला जात आहे. हैदराबादविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
हैदराबाद संघ
तन्मय अग्रवाल (क), अक्षत रेड्डी, रोहित रायडू, तनय थियागराजन, तेलुकुपल्ली रवी तेजा, मिकिल जैस्वाल, प्रतीक रेड्डी (विकेटकीपर), राहुल बुद्धी, मेहरोत्रा शशांक, चिंताला रक्षनन रेड्डी, कार्तिकेय काक
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…