T-20 World Cup 2024 आधी ऑस्ट्रोलीयाने घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंची संघात केली इंट्री तर कर्णधारही बदलला..

T-20 World Cup 2024 आधी ऑस्ट्रोलीयाने घेतला मोठा निर्णय, 'या' दोन दिग्गज खेळाडूंची संघात केली इंट्री तर कर्णधारही बदलला..

T-20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाने या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 15 जणांचा मजबूत संघ जाहीर केला आहे. मालिकेतील पहिला T20 सामना बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाईल. या मालिकेतील उर्वरित दोन सामने ऑकलंडमध्ये होणार आहेत. परंतु त्याआधी ऑस्ट्रोलीयाने जाहीर केलेला संघ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

T-20 World Cup 2024  पूर्वी  पॅट कमिन्सकडून काढून घेण्यात आले कर्णधारपद.

AUS vs NZ: विश्रांतीनंतर ऑस्ट्रोलीयाचे दिग्गज खेळाडू संघात परतले, या कारणामुळे संघात असूनही पॅट कमिन्स सांभाळणार नाही कर्णधारपद..

ऑस्ट्रोलीया निवड समितीने सर्वानत मोठा निर्णय घेतला होत म्हणजे कमिन्सला संघात असून कर्णधार न बनवणे.  पॅट कमिन्स हा या संघाचा भाग आहे पण मिचेल मार्शकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे आता पॅट कमिन्स सर्व फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असेल, असा अंदाज सर्वजण बांधत आहेत. अशीही शक्यता आहे की, अनुभवी अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स त्याच्या कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी तिन्ही सामने खेळणार नाही आणि म्हणूनच मार्शला संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली गेली असावी.

ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथचे T20 संघात पुनरागमन

T-20 World Cup 2024 पूर्वी ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडविरुद्ध शेवटची टी २० मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क तसेच फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी टी-20 संघात पुनरागमन केले आहे.

तर वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला या संघात स्थान मिळवता आलेले नाही. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात बेहरनडॉर्फला ऑस्ट्रेलियाचा पुरुष T20 खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर शॉन ॲबॉटलाही संघातून वगळण्यात आले आहे. या दोन गोलंदाजांच्या जागी पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने स्थान मिळवले आहे. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरही या संघात आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे.

T-20 World Cup 2024 आधी ऑस्ट्रोलीयाने घेतला मोठा निर्णय, 'या' दोन दिग्गज खेळाडूंची संघात केली इंट्री तर कर्णधारही बदलला..

न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

मिचेल मार्श (कर्णधार), पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *