T-20 World Cup 2024: नेपाल -ओमान संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकासाठी ठरले पात्र..!

T-20 World Cup 2024

 

T-20 World Cup 2024 : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत कमजोर टीम समजली जाणारा  नेपाळचा संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ (T-20 World Cup 2024) साठी पात्र ठरला आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच २० संघ खेळताना दिसणार आहेत. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेचे सामने नेपाळमध्ये खेळले गेले. दरम्यान, नेपाळने यूएईचा 8 गडी राखून पराभव करत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. या सामन्यात UAE ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 134 धावा केल्या.

T-20 World Cup 2024

यूएईने दिलेले 135 धावांचे लक्ष्य नेपाळने 17.1 षटकात पूर्ण केले. त्यांच्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज आसिफ शेखने 51 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. दरम्यान, कर्णधार रोहित पौडेलनेही 20 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि त्यामुळे पौडेल आणि कंपनीने 8 गडी राखून विजय मिळवला. नेपाळ क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा क्षण आहे कारण ते प्रथमच या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

T-20 World Cup 2024 आशियाचा संघ ओमानही विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

ओमानचा संघही विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच खेळताना दिसणार आहे. ओमानने बहरीनचा १० गडी राखून पराभव केला. बहरीनने प्रथम फलंदाजी करताना 106 धावा केल्या होत्या, ज्या ओमानने 14.2 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केल्या. आतापर्यंत 18 संघ T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आफ्रिका क्वालिफायरद्वारे ठरवले जातील. त्याचे सर्व सामने नामिबियात खेळवले जातील.


हेही वाचा: