T-20 World Cup 2024: विश्वचषक संबंधी मोठी माहिती समोर, सर्वच देशांच्या संघाना ‘या’ तारखेपर्यंत कराव्या लागणार गोष्टी पूर्ण..

T-20 World Cup 2024: विश्वचषक संबंधी मोठी माहिती समोर, सर्वच देशांच्या संघाना 'या' तारखेपर्यंत कराव्या लागणार गोष्टी पूर्ण..

T-20 World Cup 2024 : T-20 विश्वचषक 2024 संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत, ज्यांची 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील गुणतालिकेतील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

T-20 World Cup 2024: विश्वचषक संबंधी मोठी माहिती समोर, सर्वच देशांच्या संघाना 'या' तारखेपर्यंत कराव्या लागणार गोष्टी पूर्ण..

1 जून पासून सुरु होणार T-20 World Cup 2024 स्पर्धा..

T-20 World Cup 2024 स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून अंतिम सामना 28 जून रोजी होणार आहे. हा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वचषक खेळवला जाणार आहे. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, सर्व देशांना त्यांच्या संघांची घोषणा कधी करायची आहे, याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे.  सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांना 1 मे पर्यंत त्यांचे संघ आयसीसीकडे सोपवावे लागतील.

T-20 World Cup 2024

T-20 World Cup 2024 स्पर्धेत 25 मे पर्यंत संघात करू शकतात बदल.

1 मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला देण्यात आलेल्या संघात 25 मे पर्यंत बोर्ड सहज बदल करू शकते. मात्र, त्यानंतर संघात बदल झाल्यास आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. आयपीएलमधील खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी बीसीसीआयकडे पूर्ण वेळ असेल जेणेकरुन त्यांच्या फॉर्मच्या आधारे खेळाडूंची निवड करणे त्यांना सोपे जाईल.

ICC T20 World Cup 2024 Schedule, Teams, Venue, Formats - JobAvsar.In

भारताचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे.

भारतीय संघ 5 जूनपासून टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल.


हेही वाचा:

“माही सुट्टा मार रहा है..” महेंद्रसिंग धोनी हुक्का पितांनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, चाहत्यांना संताप अनावर, पहा व्हायरल व्हिडीओ..

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *