T-20 World Cup 2024: उन्मुख चंद याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न राहणार अधुरे; अमेरिकेने दिली कोरी अँडरसनला संधी!

0
2
T-20 World Cup 2024: उन्मुख चंद याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न राहणार अधुरे; अमेरिकेने दिली कोरी अँडरसनला संधी!

 T-20 World Cup 2024: 1 जून पासून वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे संयुक्तरित्या टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीला अमेरिका टीम लागली आहे. विश्वचषक स्पर्धे आधी अमेरिकेचा संघ कॅनडा विरोधी 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. 15 जणांच्या या संघामध्ये अनेक स्टार खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये न्युझीलँडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन याला संधी मिळाली आहे. जवळपास सहा वर्षाच्या गॅपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो पदार्पण करणार आहे.

अमेरिकेच्या या संघामध्ये दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. मात्र 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या उनमुक्त चंद याला संधी मिळाली नाही.

एकेकाळी न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कोरी एंडरसन प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या जरूर लक्षात असेल. त्याने 2018 मध्ये न्यूझीलंड कडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. 2020 मध्ये हा खेळाडू अमेरिकेत स्थायिक झाला. त्यानंतर या अष्टपैलू खेळाडूला अमेरिकेच्या संघामध्ये जागा मिळाली. येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तो अमेरिका संघाकडून खेळताना दिसू शकतो.

T-20 World Cup 2024: उन्मुख चंद याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न राहणार अधुरे; अमेरिकेने दिली कोरी अँडरसनला संधी!

33 वर्षीय कोरी अँडरसन याने अमेरिकेतील मायनर लीग मधील 28 डावात 900 धावा केल्या आहेत. मेजर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने धावांचा पाऊस पडला आहे. 19 वर्षाखालील भारतीय संघात खेळलेला हरमित सिंग याला देखील अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. यासोबतच दिल्लीचा माजी खेळाडू आणि आयपीएल मध्ये आरसीबी कडून खेळणारा मिलिंद कुमार याचा देखील समावेश संघात करण्यात आला आहे. त्याने 35 डावात 1100 धावा केल्या होत्या. यासोबतच कॅनडाचा माजी कर्णधार नीतीश कुमार याची देखील संघात निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेला उनमुक्त चंद याला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. मायनर लीग मध्ये तीन हंगामात धमाकेदार कामगिरी करूनही त्याला अमेरिकेच्या संघात स्थान मिळवता आले नाही. त्याने 45 डावात दीड हजार हून अधिक धावा केल्या आहेत, तरी देखील त्याचे नाव संघात नाही. विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणाऱ्या या मालिकेमध्ये उन्मुख त्याला संधी न मिळाल्याने आता विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचाही त्याचे स्वप्न अधुरे राहू शकते. यासोबतच दक्षिण आफ्रिकेकडून 89 फर्स्ट क्लास सामने खेळणारा व्हॅन सकालॉक याला देखील संघात संधी मिळाली आहे. अमेरिकेने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मोनांक पटेल याच्याकडे सोपवले आहेत तर एरोन जोन्स हा संघाचा उपकर्णधार आहे.

 T-20 World Cup 2024 साठी अमेरिकेचा संघ!

मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), कोरी अँडरसन, उस्मान रफिक, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्क्विक, निसर्ग पटेल, स्टीव्हन टेलर, नॉस्तुश केन्झिगे, गजानंद सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, सौरभ नेत्रावलकर,अँड्रिज गॉस, नितीश कुमार.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here