T-20 World Cup 2024: रोहित,हार्दिक सूर्या नाही तर ‘हा’ खेळाडू करणार विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व, बीसीसीआय वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत..!

T-20 World Cup 2024: रोहित,हार्दिक सूर्या नाही तर 'हा' खेळाडू करणार विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व, बीसीसीआय वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत..!

T-20 World Cup 2024:  T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होत आहे. यासाठी अद्याप कोणत्याही संघाचे पथक जाहीर करण्यात आलेले नाही. शिवाय महत्वाचे म्हणजे या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल याबाबत साशंकता आहे. मात्र, रोहित शर्मा टी-20 इंटरनॅशनलमध्ये परतला आहे, त्यामुळे त्याला पहिली पसंती आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात सातत्याने टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या हार्दिक पांड्यालाही संधी आहे.

IPL Auction 2024

रोहितच्या जागी हार्दिककडे मुंबई इंडियन्सची कमानही सोपवण्यात आली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव अनेक प्रसंगी टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसला आहे. मात्र आता या 3 व्यतिरिक्त चौथा स्पर्धकही पुढे आला आहे. नक्की कोण आहे तो खेळाडू आणि बीसीसीआय (BCCI) त्याच्या नावाला का पसंदी देऊ शकते? जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..

Ind vs Eng 1st test: पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची मोठी चूक.. संघाला होऊ शकते नुकसान, या सामनावीर खेळाडूला केले संघातून बाहेर; चाहते भडकले..!

T-20 World Cup 2024:  कर्णधार पदाच्या शर्यतीत उतरलेला चौथा खेळाडू कोण?

विश्वचषकात कर्णधारपदासाठी मुख्य स्पर्धा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात आहे, हे आपल्याला माहितीच आहे.  तर सूर्यकुमार यादव बॅकअप पर्याय म्हणून असेल. पण गेल्या काही काळापासून केएल राहुल पांढरा चेंडू आणि लाल चेंडू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. एवढेच नाही तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.

टीम इंडियाच्या T20 संघाबद्दल बोलायचे झाले तर, हे पद सध्या भरले जात नाही. इशान किशनने अचानक ब्रेक घेतला, संजू सॅमसन आणि जितेश शर्माचे संघातील स्थान निश्चित झालेले नाही आणि अपघातानंतर ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर आहे. अशा परिस्थितीत राहुलने T20 विश्वचषक 2022 पासून T20 आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही.  2019 च्या T20 विश्वचषकात तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिसला दिसला होता.

Jaisa Chal Raha Hai...: Rohit Sharma Gives MASSIVE Update Regarding Hardik  Pandya's Return From Injury | Cricket News, Times Now

इतकंच नाही तर ,राहुल गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता. अनेक प्रसंगी त्याने वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. याच कारणामुळे राहुल टी-20 मध्येही कर्णधारपदाचा दावेदार होऊ शकतो. मात्र यासाठी अट अशी असेल की, रोहित आणि हार्दिक दोघेही उपस्थित नसतील. पण दावा नाकारता येत नाही. म्हणजेच राहुल विश्वचषकासाठी संघात असेल तर टीम इंडियाकडे कर्णधारपदाचे 4-4 ठोस पर्याय निवड कर्त्यांसमोर आहेत.

T-20 World Cup 2024:  आयपीएल 2024 मधील कामगिरीच्या जोरावर निवडला जाईल विश्वचषकासाठी भारतीय संघ.

T-20 World Cup 2024: रोहित,हार्दिक सूर्या नाही तर 'हा' खेळाडू करणार विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व, बीसीसीआय वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत..!

टी-20 विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. आयपीएल 2024 चे आयोजन मार्चच्या अखेरीपासून ते मे अखेरपर्यंत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठीचे संघ १ मे पर्यंत जाहीर होणार आहेत. त्यात 20 मे पर्यंत बदल होऊ शकतात. म्हणजेच आयपीएलच्या पूर्वार्धात खेळाडूंच्या कामगिरीमुळे त्यांना टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळू शकते. आयपीएलचे वेळापत्रक आजून समोर आलेले नाहीये.. परंतु अंदाजे 22 मार्चपासून ही सर्वांत मोठी टी-२० स्पर्धा खेळवली जाणार आहे..


हेही वाचा:

सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण आहे सर्वांत श्रीमंत, महागड्या गाड्या ते कोट्यावधींची जमीन; एवढी आहे एकूण संपत्ती…!

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *