T-20 Worldcup 2024: यशस्वी जयसवाल ठरतोय शुभमन गिलसाठी धोकायदायक.. काढतोय 200 च्या स्ट्राईक रेटने धावा; कोणाला मिळेल टी-२० विश्वचषकामध्ये संधी…

T-20 Worldcup 2024: यशस्वी जयसवाल ठरतोय शुभमन गिलसाठी धोकायदायक.. काढतोय 200 च्या स्ट्राईक रेटने धावा; कोणाला मिळेल टी-२० विश्वचषकामध्ये संधी...

T-20 Worldcup 2024:  काल (14 नोव्हेंबर) रोजी झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत अफगाणिस्तानविरुद्धची 3 टी-20 सामन्यांची मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने आतापर्यंत 2-0 अशी  अजेयआघाडी घेतली आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने तुफानी खेळी केली आहे. पहिल्या सामन्यात यशस्वी खेळला नाही, पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो खेळाडू परतला आणि रोहित शर्मासोबत सलामीला आला. शुभमन गिलच्या जागी यशस्वीचा संघात समावेश करण्यात आला. या सामन्यात यशस्वीने अप्रतिम खेळी केली आहे. या खेळाडूने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. यावरून शुबमन गिलला आता पुनरागमन करणे कठीण झाल्याचे दिसते.

यशस्वी 200 च्या स्ट्राईक रेटने काढतोय धावा .

यशस्वीने दुसऱ्या टी-२० सामन्यात अप्रतिम खेळी केली आहे. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने 68 धावांची खेळी खेळली आहे. या खेळीदरम्यान यशस्वीच्या बॅटमधून 5 चौकार आणि 6 षटकारही आले. अशा परिस्थितीत गिलच्या जागी यशस्वी  योग्य आहे,असा अंदाज निवड समितीला आला असावा. गिलच्या जागी या खेळाडूचा संघात समावेश करून त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यावरून खेळाडूने शुभमन गिलचे स्थान हिसकावून घेतल्याचे दिसते. आता शुभमन गिलला संघाबाहेर राहावे लागू शकते. पहिल्या T20 मध्ये गिलला आपली जागा निश्चित करण्याची संधी मिळाली, परंतु त्याच्या बॅटमधून केवळ 23 धावा झाल्या. अशा स्थितीत यशस्वीने गिलपेक्षा खूपच चांगला खेळ केला आहे.

 

गिलचं T-20 Worldcup 2024 खेळणे होतंय कठीण..

T-20 Worldcup 2024: यशस्वी जयसवाल ठरतोय शुभमन गिलसाठी धोकायदायक.. काढतोय 200 च्या स्ट्राईक रेटने धावा; कोणाला मिळेल टी-२० विश्वचषकामध्ये संधी...

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेनंतर भारताला विश्वचषक खेळायचा आहे. अशा स्थितीत जून महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात यशस्वीचा भारतीय संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास शुभमन गिलला संघात खेळणे कठीण होईल. अशा स्थितीत यशस्वी गिलचे टी-२० मधील स्थान कायमचे हिरावून घेण्याची शक्यता आहे. आता १७ जानेवारीला भारत आणि अफगाणिस्तान(IND vs AFG)  यांच्यात तिसरा टी-२०  सामना होणार आहे. या सामन्यात यशस्वीच्या कामगिरीवरही संघ निवडक विशेष लक्ष देतील. आणि या सामन्यात यशस्वीने जबरदस्त खेळी खेळल्यास शुभमन गिलचे संघातील स्थान आणखी जास्त धोक्यात येणार ज्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न धूसर होताना दिसतेय..


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *