T20 आतंरराष्ट्रीय सामन्यात चौकार पेक्षा जास्त षटकार मारलेले आहेत हे 5 खेळाडू, भारतातील या खेळाडूंचा समावेश.

T20 आतंरराष्ट्रीय सामन्यात चौकार पेक्षा जास्त षटकार मारलेले आहेत हे 5 खेळाडू, भारतातील या खेळाडूंचा समावेश.
आजकाल जास्त लोकांना टेस्ट मॅचेस पेक्षा T 20 च्या मॅचेस पाहायला आवडतात. कारण या मॅचेस कमी वेळात पूर्ण होतात शिवाय अनेक खेळाडूंच्या जबरदस्त खेळी म्हणजेच फलंदाजी आणी गोलंदाजी पाहायला मिळतात. या T 20 सामन्यात फलंदाज विचार न करता धमाकेदार खेळी करत असतात. षटकार आणि चौकार चा जणू पाऊस च पाडला जातो.

T20 सामन्यात कमी वेळात जास्त स्कोअर आणि धावा करण्यासाठी फलंदाज आक्रमक होऊन खेळात असतात शिवाय गोलंदाज सुद्धा त्याच कौशल्याने गोलंदाजी करून अचंबित करत असतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी T20 आतंरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारले आहेत.
हार्दिक पांड्या:-
हार्दिक पांड्या भारताचा आक्रमक फलंदाज आहे शिवाय हार्दिक पांड्या हा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तसेच भारतीय संघाचा फिनिशर म्हणून सुद्धा हार्दिक पांद्याला ओळखले जाते.
हार्दिक पांड्या ने 2016 रोजी ऑस्ट्रेलिया सोबत पहिला T20 सामना खेळला होता. हार्दिक पांड्या ने आजपर्यंत 49 सामने खेळून 484 धावा बनवल्या आहेत. यादरम्यान हार्दिक पांड्या ने 30 षटकार आणि 27 चौकार मारले आहेत.
एल्बी मोर्केल:-
एल्बी मोर्केल हा दक्षिण आफ्रिका देशाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. एल्बी मोर्केल ने न्युजलंड विरोधात 2004 साली पहिला T 20 चा सामना खेळला. आतापर्यंत एल्बी मोर्केल ने 50 T20 चे सामने खेळून 572 धावा केल्या. यामधे त्याने 39 षटकार मारून 29 चौकार मारले होते.
आंद्रे रसेल:-
वेस्ट इंडिज चा आक्रमक खेळाडू तसेच फलंदाज म्हणून आंद्रे रसेल ला ओळखले जाते. 2011 मध्ये पाकिस्तान विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 60 सामन्यात आंद्रे रसेल ने 716 धावा काढल्या. यामध्ये 60 षटकार आणि 40 चौकार मारत खेळी केली.
कीरोन पोलार्ड:-
वेस्ट इंडिज चा आक्रमक खेळाडू तसेच फलंदाज म्हणून कीरोन पोलार्ड ला ओळखले जाते. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 86 सामन्यात आंद्रे रसेल ने 1378 धावा काढल्या. यामध्ये 93 षटकार आणि 39 चौकार मारत खेळी केली.
एविन लुईस:-
वेस्ट इंडिज चा सलामी खेळाडू तसेच फलंदाज म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते. 2016 मध्ये अफगाणिस्तान विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 45 सामन्यात आंद्रे रसेल ने 1318 धावा काढल्या. यामध्ये 103 षटकार आणि 95 चौकार मारत खेळी केली. वेस्ट इंडीज चा सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…