T20 World Cup 2024 Australia Squad: आता सर्व देश T20 World Cup 2024 साठी त्यांचे संघ जाहीर करत आहेत. काल टीम इंडियाने इंग्लंडला आपापले संघ जाहीर केले होते, तर आज ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाची कमान मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे.
T20 World Cup 2024 Australia Squad: या खेळाडूंना संधी मिळाली नाही.
अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ, युवा स्फोटक फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ यांनाही टी-20 विश्वचषक 2024 साठी जाहीर झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळालेली नाही. स्टीव्ह स्मिथ विश्वचषक खेळणार नसल्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले असले तरी जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या बाबतीत मात्र हा युवा फलंदाज यावेळी विश्वचषकात खेळताना दिसणार असल्याचे चाहत्यांना वाटत होते. जॅक फ्रेझर मॅकगर्क आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अप्रतिम फलंदाजी करत आहे.
T20 World Cup 2024 Australia Squad: या खेळाडूंची झाली संघात एंट्री.
2022 मध्ये टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या ऍस्टन अगरचा पुन्हा एकदा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरून ग्रीन यांनाही संधी मिळाली आहे. संघाच्या घोषणेनंतर ऑस्ट्रेलिया संघ निवडीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणतात की आता त्यांच्याकडे विश्वचषकासाठी सर्वात संतुलित संघ आहे, जो स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल.
T20 World Cup 2024 Australia Squad: T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
- ====आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..