T20 World Cup 2024: आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या 5 गोलंदाजाना मिळू शकते भारतीय संघात जागा,सध्या करताहेत तुफानी प्रदर्शन..!

0
2
T20 World Cup 2024: आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या 5 गोलंदाजाना मिळू शकते भारतीय संघात जागा,सध्या करताहेत तुफानी प्रदर्शन..!

T20 World Cup 2024:  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) ची 17 वी आवृत्ती सध्या सुरु आहे. जवळपास दररोज चाहत्यांना रोमांचक सामने आणि खेळाडूंची मंत्रमुग्ध करणारी कामगिरी पाहायला मिळत आहे. यासोबतच जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) साठी खेळाडू, आयोजक आणि व्यवस्थापनाची तयारीही जोरात सुरू झाली आहे.

युजवेंद्र चहलचा मोठा धमका, 13 वर्षांपूर्वीचा शेन वॉर्न यांचा विक्रम मोडत काढत केली असी कामगिरी..!

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती लवकरच या आगामी मेगा स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करू शकते. आयपीएल 2024 मध्ये टीम इंडियामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही निवडक खेळाडूंनाही निवडकर्ते संधी देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू ज्यांना आयपीएलमधील प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.

KKR vs PBKS: सामन्याआधीच मैदानातून व्हायरल झालेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे? याआधी ही केकेआरसाठी करत होती चीअर..!

T20 World Cup 2024:  या 5 खेळाडूंना संधी मिळू शकते.

आयपीएल 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी खूपच प्रभावी दिसत आहे. विशेषत: भारतीय गोलंदाजांसाठी हा मोसम खूप चांगला गेला. खरे तर या मोसमात पर्पल कॅप शर्यतीतील अव्वल ५ खेळाडू भारतीय आहेत आणि असे दृश्य फार कमी वेळा पाहायला मिळते.

जसप्रीत बुमराहने मोडला आशिष नेहराचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा केली अशी कामगिरी..!

IPL 2024 च्या 41 सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह अव्वल आहे. त्याच्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल दुसऱ्या, पंजाब किंग्जचा हर्षल पटेल तिसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आणि सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत सहभागी असलेल्या या सर्व अव्वल ५ भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी ते टीम इंडियात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहेत. यापैकी दोन खेळाडू जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांची संघात जागा आधीच निश्चित झालेली दिसते. मात्र आता युजवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि टी नटराजन यांच्या नावाचीही चर्चा होऊ शकते. दुय्यम फिरकी गोलंदाज म्हणून युझवेंद्र चहल खूप उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय हर्षल आणि नटराजन यांच्यातही चांगले स्पेल टाकण्याची क्षमता आहे.

T20 World Cup 2024:  आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या 5 गोलंदाजाना मिळू शकते भारतीय संघात जागा,सध्या करताहेत तुफानी प्रदर्शन..!

T20 World Cup 2024 साठी निवडले जाऊ शकणारे भारतीय गोलंदाज आणि त्यांची आयपीएलमधील कामिगिरी..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here