T20 world cup 2024 Schedule: T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होईल. आयपीएल 22 मार्चपासून सुरू होऊ शकते, तर मेच्या अखेरीस सुमारे दोन महिन्यांनंतर स्पर्धा संपू शकते. यानंतर १ जूनपासून टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
आता बीसीसीआयने याबाबत स्वतःची खास योजना बनवली आहे. आयपीएलच्या (IPL 2024) मध्यभागी बोर्ड खेळाडूंना तयारीसाठी न्यूयॉर्क (USE) येथे पाठवणार असल्याचे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी जे खेळाडू विश्वचषक खेळणार आहेत ते अमेरिकेला रवाना होतील.
T20-world cup-2024: जे आयपीएल संघ आयपीएलच्या बाद फेरीसाठी पात्र ठरले नाही त्यांमधील टीम इंडियाचे खेळाडू लवकर होणार रवाना.
The BCCI send the players whose teams don’t qualify for the playoffs, earlier to New York for T20 World Cup. (PTI)
– Whole those who play the KOs stages joining team after the IPL 2024 over. pic.twitter.com/Iej7THZwYR
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 13, 2024
बीसीसीआय टी-२० विश्वचषकासाठी भारतीय खेळाडूंना आधी न्यूयॉर्कला पाठवू शकते, असे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी, ज्या खेळाडूंचे संघ आयपीएल 2024 च्या बाद फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाहीत ते आयपीएल प्ले-ऑफ दरम्यान यूएसएला जातील. टीम इंडिया 5 जूनपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल.
आयपीएलच्या मध्यावरच होणार विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा.
ही स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व २० संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संघाची घोषणा करावी लागणार आहे. 20-22 मे पर्यंत संघ त्यांच्या संघात अंतिम बदल करू शकतील. यानंतर जे काही बदल घडतील, त्यासाठी आयसीसीकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही परंतु स्पर्धेच्या मध्यभागी पहिल्या टप्प्यानंतर विश्वचषक संघ जाहीर केला जाईल हे निश्चित आहे.
T20 world cup 2024: 9 जून रोजी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला.
भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना खेळेल. भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए ग्रुप ए मध्ये आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत असून सर्व 5-5 संघ एका गटात विभागले गेले आहेत.
असे खेळवले जाणार T20 world cup 2024चे सर्व सामने.
प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात ४-४ सामने खेळावे लागतीलग्रुप स्टेजनंतर, बाद फेरी सुरू होईल ज्यामध्ये प्रथम शेवटची 8 म्हणजे उपांत्यपूर्व फेरी आणि नंतर शेवटची 4 उपांत्य फेरी होईल. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश करतील. येथील लढतीनंतर चार संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत.
BCCI might send the Indian players earlier to New York for T20I World Cup whose teams don’t qualify for the IPL play-offs. [PTI] pic.twitter.com/ebTGscXYey
— Johns. (@CricCrazyJohns) February 13, 2024
1 ते 18 जून दरम्यान 40 गट टप्प्यातील सामने होणार आहेत. यानंतर 19 ते 24 जून दरम्यान शेवटचे 8 सामने खेळवले जातील. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी, तर विजेतेपदाचा सामना 29 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेचे सामने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील एकूण 9 मैदानांवर होणार आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.