T20 World Cup 2024: निवड समितीचे वाढले टेंशन..! टी-२० विश्वचषक साठी तब्बल 6 यष्टीरक्षक खेळाडू मैदानात, करताहेत एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी..!

T20 World Cup 2024: निवड समितीचे वाढले टेंशन..! टी-२० विश्वचषक साठी तब्बल 6 यष्टीरक्षक खेळाडू मैदानात, करताहेत एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी..!

T20 World Cup 2024: T20 World Cup 2024  2 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ आयर्लंडशी भिडणार आहे. न्यूयॉर्कमध्ये 5 जून रोजी हा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. निवडकर्ते लवकरच विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकतात. यासाठी निवडकर्ते 27-28 एप्रिल रोजी बैठक घेऊ शकतात.

T20 World Cup 2024: बीसीसीआयने बोलावली अर्जेंट बैठक, या दिवशी होऊ शकते टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा..!

मात्र, संघ निवडीपूर्वी यष्टिरक्षकांनी निवड समितीचे टेन्शन वाढवले ​​आहे. 6 यष्टिरक्षक विश्वचषकासाठी दावा करत आहेत. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, इशान किशन आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. आयपीएल 2024 मधील या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया.

T20 World Cup 2024: ऋषभ पंतला जागा मिळणे जवळपास निश्चित आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये त्याने 35 च्या सरासरीने आणि 156.71 च्या स्ट्राईक रेटने 210 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. पंत 2024 च्या विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

T20 World Cup 2024: केल एल राहुलही तैयारीमध्ये..!

लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराने आतापर्यंत 7 सामन्यात 286 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 40.85 आणि स्ट्राइक रेट 143.00 होता. राहुलने आतापर्यंत लीगमध्ये 2 अर्धशतके झळकावली आहेत.

 T20 World Cup 2024 गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडणाऱ्या गोलंदाजाचे आयपीएल पदार्पण गेले फेल, एका षटकात दिल्या तब्बल 22 धावा..!

T20 World Cup 2024:संजू सॅमसन जबरदस्त लयीत..

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने 7 सामन्यात 55.20 च्या सरासरीने आणि 155.05 च्या स्ट्राईक रेटने 276 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. 17व्या सत्रात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 82* धावा आहे.

T20 World Cup 2024: दिनेश कार्तिकनेही ठोकला दावा..!

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही या मोसमात बॅटने कहर करत आहे. त्याने नुकतीच विश्वचषक खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्याने 7 सामन्यांच्या 6 डावात 75.33 च्या सरासरीने आणि 205.45 च्या स्ट्राईक रेटने 226 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.

T20 WORLDCUP 2024: "नाव दिनेश काम विशेष", या 3 कारणामुळे विश्वचषक स्पर्धेत दिनेश कार्तिकची होऊ शकते भारतीय संघात निवड

T20 World Cup 2024:ईशान किशन ही करतोय जबरदस्त कामगिरी..!

मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो MI ला चांगली सुरुवात करत आहे. ईशानने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 192 धावा केल्या आहेत. जितेश शर्माही विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याने 7 सामन्यात 115 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सर्वोच्च धावसंख्या २९ धावा आहे.

T20 World Cup 2024: निवड समितीचे वाढले टेंशन..! टी-२० विश्वचषक साठी तब्बल 6 यष्टीरक्षक खेळाडू मैदानात, करताहेत एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी..!

या सर्व खेळाडूंमुळे आता बीसीसीआय आणि निवड समितीचे टेन्शन वाढले आहे. वरीलपैकी कोणत्या 2 खेळाडूंना T20 World Cup 2024 साठी भारतीय संघामध्ये यष्टीरक्षक म्हणून संधी मिळेल, हे येणारी वेळच ठरवले..!


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *