T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या की रोहित शर्मा? कोण करणार टीम इंडियाचे नेतृत्व.. वाचा स्पेशल रिपोर्ट..

T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या की रोहित शर्मा? कोण करणार टीम इंडियाचे नेतृत्व.. वाचा स्पेशल रिपोर्ट..

T20 World Cup 2024: क्रिकेटच्या महाकुंभात यंदा आयसीसीकडून टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.    ICC T20 World Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत असून, यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. सर्व संघांना ५-५ साखळी सामने खेळायचे आहेत. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.

T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या की रोहित शर्मा? कोण करणार टीम इंडियाचे नेतृत्व.. वाचा स्पेशल रिपोर्ट..

भारताचा कर्णधार कोण होणार यावर अजूनही सस्पेंस कायम आहे. दरम्यान याबाबतीत टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि क्रिकेट दिग्गज आपपल्या मते टीम इंडियाचे कर्णधार पद कुणाच्या हाती देण्यात यावे, यावर वक्तव्य करत आहेत.  माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील T20 वर्ल्ड कपसाठी कोणाला कर्णधारपद द्यायला हवे.

आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलपासून रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माकडून कर्णधारपद हिरावल्याची चर्चा होती, मात्र आजतागायत रोहित शर्माकडून कर्णधारपद हिरावून घेण्यात आलेले नाही. अशा स्थितीत टी-२० विश्वचषकात रोहित शर्माचे कर्णधारपद चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून हिसकावून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते.आता रोहित शर्माकडून टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.  

या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने दिले आहे. तो म्हणाला की,

“भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. विश्वचषकादरम्यानच त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर अनेक मालिकांसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. आता अफगाणिस्तानविरुद्ध पांड्याचं पुनरागमनही कठीण वाटतंय, अशा परिस्थितीत रोहित शर्माला टी-२० विश्वचषकात कर्णधारपदाची जबाबदारी मिळायला हवी.”

 

 

रोहितही तंदुरुस्त असून विश्वचषकानंतर अनेक सामने खेळला आहे, त्यामुळे रोहितला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकासाठी संघाचे कर्णधारपद मिळावे.


हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *