T20 World Cup 2024: भारतीय संघासाठी मोठी बातमी… हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त; विश्वचषक खेळू शकणार की नाही? बीसीसीआयने केले स्पष्ट..!

0
1
T20 World Cup 2024: भारतीय संघासाठी मोठी बातमी... हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त; विश्वचषक खेळू शकणार की नाही? बीसीसीआयने केले स्पष्ट..!

T20 World Cup 2024:  टीम इंडियाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज  सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या या हंगामात उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. सूर्यकुमार यादवच्या बॅटमधूनही धावा होताना दिसत आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सूर्याने स्फोटक फलंदाजी करत नाबाद शतक झळकावले. त्याचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे.

 

या खेळीदरम्यान सूर्यकुमार यादव काहीसा अस्वस्थ दिसत होता. त्याच्या बॅटमधून धावा आल्या पण त्याच्या पायात काही समस्याही दिसल्या.धावा घेण्यासाठी पळताना तो अडचणीत आला होता. एवढे सगळे असतानाही सूर्यकुमार यादवने सहा षटकारांसह संघाला विजयापर्यंत नेले आणि शतकही पूर्ण केले. त्याला दुखापत झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि तसे झाल्यास टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो.

IND vs SA: सुर्यकुमार यादवने मोडला धोनीचा मोठा विक्रम, दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला नंबर 1 कर्णधार.

यावर स्पष्टीकरण देतांना सूर्या म्हणाला की, 

बऱ्याच दिवसांनी मी एवढा वेळ फलंदाजी करत आहे. 20 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर  18 षटके फलंदाजी केली.त्यामुळे थोडे थाक्ल्यासार्ख जाणवत होत. आणि पायाला दुखापत देखील झाली आहे. मात्र ही लवकरच कमी पूर्ण होईल आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त होईल.

या वर्षाच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादव यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तंदुरुस्ती मिळवून तो पुन्हा मैदानात परतला आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत तो भारताकडून शेवटचा खेळला होता. आता तो फिट दिसत आहे.

या हंगामात, सूर्याने आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फलंदाजी केली नाही, परंतु नंतर त्याने स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि चार वेळा 50 हून अधिक धावा केल्या. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने झळकावलेले शतक हे चांगले लक्षण म्हणता येईल. मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 7 गडी राखून पराभव करत या मोसमात चौथा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहोचले. मुंबई इंडियन्सकडे सध्या आणखी 2 सामने खेळायचे आहेत. मुंबई अद्याप प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही पण प्रकरण खूपच अवघड आहे.

T20 World Cup 2024: भारतीय संघासाठी मोठी बातमी... हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त; विश्वचषक खेळू शकणार की नाही? बीसीसीआयने केले स्पष्ट..!

सूर्याच्या फिटनेसवर बीसी सीआयने स्पष्टीकरण..

सूर्याच्या फिटनेसबद्दल बोलतांना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सूर्याची दुखापत ही छोटी आहे. आणि अश्या दुखापतीमधून सावरण्यासाठी खेळाडूंना 2/3 दिवसांचा वेळ पुरेसा असतो. मुंबई इंडियन्स आयपीएल 2024  मधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आताआयपीएलचे प्ले ऑफ सामने संपेपर्यंत सुर्याकुमार यादव एकदम फिट झालेला असेल. तो टी-२० विश्वचषकात संपूर्ण फिट होऊन उतरेल असी आम्हाला खात्री आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here