रिषभ पंत सह टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी या 3 यष्टीरक्षकांची होऊ शकते निवड,निवड समिती आयपीएलमधील कामगिरीवर ठेवणार लक्ष.

रिषभ पंत सह टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी या 3 यष्टीरक्षकांची होऊ शकते निवड,निवड समिती आयपीएलमधील कामगिरीवर ठेवणार लक्ष.

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर लगेच टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे जून महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन वेस्टइंडीज आणि अमेरिका या देशात संयुक्तरीत्या आयोजन केले आहे. या दोन्ही देशांमध्ये भारत आणि आतापर्यंत अनेक टी 20 सामने खेळले आहेत. मात्र ज्या मैदानावर भारतीय संघाचे सामने आयोजित करण्यात आले आहे. तेथील मैदान अद्याप तयार झाले नाही. त्यामुळे तेथील खेळपट्टीचा अंदाज आत्ताच लावणे चुकीचे ठरेल.

हे आव्हान केवळ भारतीय संघासाठीच नव्हे तर इतर संघापुढे देखील असणार आहे. निवड समितीचे सदस्य या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन लवकरच भारतीय संघाची घोषणा करू शकतात. मागील वर्षी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली होती जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यासोबतच भारतीय संघाने तीन यष्टीरक्षक फलंदाज घेऊन गेले होते. मात्र यष्टीरक्षणाची संपूर्ण जबाबदारी दिनेश कार्तिक कडे देण्यात आली होती. यंदाच्या स्पर्धेसाठी तीन यष्टीरक्षक फलंदाजांनी आपला दावा ठोकला आहे. या तीन पैकी एका खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते.

टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी या 3 यष्टीरक्षकांची होऊ शकते निवड

1.ऋषभ पंत

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

टीम इंडियाचा मुख्य यष्टीरक्षक ऋषभ पंत हा नुकताच दुखापतीतून सावरला असून तो सध्या आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएल मधील पहिल्या सामन्यानंतर ऋषभ पंत फिटनेसच्या बाबतीत तो ठीकठाक दिसून आला. मात्र त्याला आणखीन लय येण्यासाठी दहा-पंधरा सामने खेळावे लागतील, असे क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी तो केवळ फिट असून चालणार नाही तर त्याला फलंदाजीमध्ये परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.

रिषभ पंत सह टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी या 3 यष्टीरक्षकांची होऊ शकते निवड,निवड समिती आयपीएलमधील कामगिरीवर ठेवणार लक्ष.

२.जितेश शर्मा

ऋषभ पंत सोबत आणखीन एका आक्रमक फलंदाजाची चर्चा रंगू लागली आहे. आपल्या स्फोटक खेळणे ओळखला जाणारा जितेश शर्मा यांचे देखील नाव चर्चेत येत आहे. त्याची आक्रमक बॅटिंगची शैली पाहून प्रत्येक जणांना धोनीची आठवण होत आहे. या खेळाडूने कोणती मोठी खेळी केली नसली तरी त्याची बॅटिंगची शैली पाहून तो भविष्यात भारतीय संघामध्ये खेळू शकतो, असंच क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे. भारतीय संघाच्या निवडीवेळी ऋषभ पंतच्या आधी जितेश शर्माचा विचार होऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

३. के एल राहुल

भारतीय क्रिकेट निवड समिती जर एकमेव यष्टीरक्षक भारतीय संघासोबत पाठवला तर तो के एल राहुल असेल. के एल राहुल असं फलंदाज आहे जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत काही महत्त्वपूर्ण विजय त्याच्या खेळीमुळेच मिळाले आहेत. त्यामुळे निवड समितीची पहिली पसंत के एल राहुलच असणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *