साई किशोर: मुंबई रणजी क्रिकेट संघाने विदर्भ संघाचा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 169 धावांनी पराभव करत चषकावर नाव कोरले. मुंबई संघाने आतापर्यंत 48 वेळा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता त्यापैकी 42 वेळा ते रणजी चषक आपल्या नावे करण्यात यशस्वी ठरले. मुंबईने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले. विशेष म्हणजे यंदाच्या रणजी हंगामामध्ये सर्वाधिक धावा अथवा सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकही मुंबईचा खेळाडू नाही.
डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा तमिळनाडू संघाचा कर्णधार साई किशोर याने नऊ सामन्यात 53 गडी बाद केले आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा तो खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीत एका हंगामात 50 विकेट पूर्ण करणारा तो तमिळनाडूचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी महान फिरकीपट्टू महान एस वेंकटराघवन (1972-73 मध्ये 58) आणि आशीष कपूर (1999-00 मध्ये 50) यांनी रणजी क्रिकेटमध्ये 50 विकेट घेण्याचा कारनामा केला होता.
साई किशोरच्या नावावर 38 फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये 160 विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने दहाव्यांदा फर्स्ट क्लास मॅच मध्ये पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. नेतृत्व आणि गोलंदाजी मध्ये दमदार कामगिरी केली.
आयपीएल मध्ये हा खेळाडू गुजरात टायटन संघाकडून खेळतोय. 2022 मध्ये या खेळाडूला तीन कोटी रुपयांमध्ये गुजरातने खरेदी केले होते. आयपीएल 2022 मध्ये याने पाच सामन्यात सहा विकेट घेतले होते. त्याचा सध्याचा परफॉर्मन्स पाहून गुजरातचा संघ भलताच खुश असणार आहे.
पुदुचेरीचा वेगवान गोलंदाज गौरव यादव याने 7 सामन्यात 41 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. पण त्याचा फारसा फायदा त्याच्या संघाला झाला नाही.
साई किशोर याच्यासोबत तमिळनाडूचा अजित राम नावाच्या फिरकी गोलंदाजाने देखील यंदाच्या रणजी हंगामात खूप प्रसिद्ध मिळवली. यंदाच्या रणजी हंगामात या दोन्ही फिरकी गोलंदाजांचा जन्म पाहायला मिळाला. तो ही आठ सामन्यात 41 बळी मिळवण्यात यशस्वी ठरला.
रवींद्र जडेजा याला फॉलो करणारा सौराष्ट्रचा फिरकीपटू धर्मेंद्र सिंग जडेजा याने देखील यंदाच्या हंगामातले रणजीचे मैदान गाजवले. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणार्या या खेळाडूने आठ सामन्यात 41 बळी घेण्यात यशस्वी ठरला.
यासह मध्य प्रदेशचा कुमार कार्तिकेय, महाराष्ट्राचा हितेश वालूंज आणि बडोद्याचा भार्गव भट्ट या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 41 गडी बाद केले होते.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!
- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.
- जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर