Team India Head Coach: अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली, हा माजी दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक.. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपली आहे. या पदासाठी प्रत्यक्षात कोणी अर्ज केला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपत आहे. आगामी प्रमुख स्पर्धा १ जून ते २९ जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मध्ये खेळवली जाईल.
भारताचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर हा या पदासाठी (Team India Head Coach)प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत काहीही सांगितलेले नाही, तर गंभीरच्या बाजूनेही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. .
गंभीरच्या मार्गदर्शनाखाली, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) नुकतेच तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले आणि या पदासाठी गौतमचा दावा मजबूत केला. बीसीसीआयकडे गंभीरशिवाय दुसरा कोणताही मजबूत पर्याय नसल्याचे दिसते. प्रशिक्षक होण्यासाठी कोणत्याही मोठ्या परदेशी नावाने रस दाखवला नसल्याचे मानले जात आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच सांगितले की, ते भारतीय क्रिकेट चांगल्या प्रकारे समजून घेणारा उमेदवार शोधत आहेत. बीसीसीआयची नजर व्हीव्हीएस लक्ष्मणवर होती, पण या पदासाठी त्यांची उत्सुकता कमी असल्याचे दिसते. लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
गंभीर होणार भारताचा पुढील मुख्य प्रशिक्षक?
आता जर गंभीर टीम इंडियाचा कोच बनला तर, केकेआरचा मालक शाहरुख खानचे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्याला आयपीएल संघ सोडणे सोपे जाणार नाही. दुसरे कारण म्हणजे गंभीरच्या प्रशिक्षक होण्याच्या शक्यतेबाबत सध्या न्यूयॉर्कमध्ये उपस्थित असलेल्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंचे मत दुर्लक्षित करता येणार नाही. आता अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कोच कोण होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे ही वाचा: