झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकायचा असेल तर टीम इंडियाला या घातक गोलंदाजाला संघात सामील करावच लागतंय…!
या सालातल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आपला भारतीय संघ आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण ४ मॅचेस मध्ये भारताने ३ मॅचेस तेही दमदार पद्धतीने जिंकून आपल्या गट २ मध्ये सर्वात वर स्थान प्राप्त केले असून पाकिस्तानला सगळ्यात शेवटच्या स्थानावर ढकलून दिले आहे.
आपले सर्वच खेळाडू जवळपास चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून भारतीय संघ नक्कीच विश्वचषक स्पर्धेवर यावर्षी भारताचे नाव कोरेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. मात्र काही अभ्यासकांच्या मते जर या खेळाडूला प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळवल्या गेले तर १०० आणि १०० टक्के भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेचा कप घेऊनच भारतात परततील अशी खात्री अनेकांना आहे आणी तसा विचार ते वारंवार व्यक्त करताना सुद्धा आढळत आहे. होय मित्रांनो!
View this post on Instagram
आम्ही याच खेळाडू बाबत बोलतो आहे ज्याचं नाव तुमच्या डोक्यात आहे. आपल्या भारतीय संघाचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहल हा नक्कीच प्रतिस्पर्ध्यांवर काळ बनून तुटून पडेल. त्याच्या कामगिरीने भारतीय संघ अधिकाधिक मजबूत होत जाईल आणि या विश्वचषक स्पर्धेत आपले स्थान पक्के करत जाईल असे अनेकांना वाटते.
मात्र आतापर्यंत रोहित शर्मा आणि त्याच्या चमुने यजुवेंद्रला झालेल्या ४ सामन्यांमध्ये खेळू दिले नाही. आणि साहजिक आहे की सध्या खेळत असलेले खेळाडू चांगली कामगिरी करत असताना यांना बदलवून नवीन काहीतरी प्रयोग करणे म्हणजे विनाकारण जखम नसताना मलम लावण्यासारखे होईल. त्यामुळे कदाचित अजून यजुवेंद्र चहरला प्रतीक्षा करावी लागत असेल.

आर.अश्विन एक स्पिनर म्हणून सध्या भारतीय संघात खेळत आहे. जरी त्यानी या तीन-चार मॅच मध्ये फारशी कामगिरी केली नसली तरी रण रोखण्यात मात्र अश्विन यशस्वी झाला हे खरे. मात्र काही अभ्यासकांच्या मते आर. अश्विन विकेट टेकर बॉलर नाही. तो आपल्या अनुभवाने रन्स मात्र रोखू शकतो; पण विकेट घेणे सहसा त्याच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे त्याला थांबवून त्याच्या जागी रिप्लेस म्हणून यजुवेंद्रला संधी द्यावी असे अनेकांचे मत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर चहर नक्कीच यशस्वी होईल अशी अनेकांना खात्रीदेखील आहे. यजुवेंद्र चहर जरी भारतीय संघासाठी रन्स देण्यात घातक ठरत असला तरी त्याच्यात ऐन वेळेला मोक्याच्या क्षणी विकेट काढण्याची क्षमता आहे. तो अशा प्रकारे बॉलिंग करतो की बॅट्समन जणू मोठे शौट्स खेळफण्यासाठी मजबूर होतो आणि अशा मध्ये एक तर तो कॅच देतो किंवा यष्टीरक्षक त्याला स्टंपिंग करून बाद करतो. आणि अशाप्रकारे विकेट टेकर म्हणून यजुवेंद्र चहर साबित होऊ शकतो.
हेही वाचा:
दक्षिण आफ्रिकेला 33 धावांनी पराभूत करून पाकिस्तानने सगळे गणित बिघडवलीत..!
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..