विश्वचषक 2023 संपताच रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा, हार्दिक -सूर्या नाही तर ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार..!

विश्वचषक 2023 संपताच रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा, हार्दिक -सूर्या नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार..!

 

भारतात सुरु असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागच्या अनेक दिवसपासून रोहित शर्मा सातत्याने क्रिकेट खेळत आला आहे. त्याचे वय आता 37 वर्ष झाले आहे. या अनुसंगाने लवकरच  रोहित शर्मा विश्वचषक संपताच क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मागच्या काही टी-२० सिरीजमध्ये  रोहितला मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या किंवा इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला कर्णधार बनवले जाते. जसे आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Gaikwad (@ruutu.131)

त्याचबरोबर, भारतीय संघात अशा युवा खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढत आहे, जे भविष्यात कायमस्वरूपी T20 संघाची जबाबदारी स्वीकारू शकतात, म्हणून आम्ही तुम्हाला अशा खेळाडूबद्दल सांगत आहोत जो भविष्यात कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात.  रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्त होताच यांपैकी एक खेळाडू टीम इंडियाचा नवा कर्णधार बनू शकतो.

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हा खेळाडू टीम इंडियाचा पुढचा T20 कर्णधार बनेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Bcci) युवा खेळाडूंवर मोठी गुंतवणूक करत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाला अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. जे  भविष्यात भारतीय संघासाठी मोठी भूमिका बजावू शकतात..

नुकतेच यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, टिळक वर्मा, मुकेश कुमार या खेळाडूंनी भारतासाठी पदार्पण केले होते. नियमित कर्णधार रोहित शर्मा, जो 37 वर्षांचा झाला आहे, तो विश्वचषक 2023 नंतर T20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. अश्या परिस्थितीमध्ये ट्रायल म्हणून सलामीवीर रुतुराज गायकवाडला टी-२० कर्णधार बनवले जाऊ शकते. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

विश्वचषक 2023 संपताच रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा, हार्दिक -सूर्या नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार..!

 रुतुराजने बनवले आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडिया चॅम्पियन

रुतुराज गायकवाड हा अप्रतिम फलंदाज असून तो एक चांगला कर्णधारही आहे. ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे आणि अलीकडेच महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2023 मध्ये पुणे फ्रँचायझीचे नेतृत्वही केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आपल्या नेतृत्वाखाली त्यांनी चीनमध्ये भारतीय तिरंगा फडकवला. या खेळाडूने कर्णधारपदाचे कौशल्य दाखवले आहे. त्यामुळे त्याला भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *