टीम इंडिया: ICC विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये सलग पाचव्या विजयाची नोंद केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह अनेक भारतीय खेळाडू सुट्टीवर गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या खेळाडूंना छोटा ब्रेक दिला आहे, त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी संघ सोडला आहे.
ब्रेक घेणाऱ्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे हे खेळाडू सहभागी..
ब्रेक घेणार्या खेळाडूंमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडू आता २६ ऑक्टोबरला लखनौला जमणार आहेत. पुढील सामन्यापूर्वी टीम इंडियाला छोटा ब्रेक मिळाला आहे. भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात भारताने किवी संघाचा 4 विकेटने पराभव केला होता. भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अपराजित आहे, पाच सामने जिंकून भारताचे १० गुण आहेत. टीम इंडियाने 2003 नंतर पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. ब्लॅक कॅप्सवर त्यांचा शेवटचा विजय 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मिळाला होता. 2019 मध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी