Team India T20 World Cup Victory Parade: यावेळी भारतीय क्रिकेट संघाने अमेरिकेत आयोजित T20 विश्वचषक जिंकून देशातील क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया आज म्हणजेच बुधवारी देशात पोहोचली आहे. टीम इंडियाने T-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये दुसरा विश्वचषक जिंकल्याच्या सन्मानार्थ मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे विजय परेडचे आयोजन करण्यात आले आहे. पाऊस असूनही विजेत्यांच्या सन्मानासाठी येथे मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. खेळाडूंची विजयी मिरवणूक निघणार आहे.
Team India T20 World Cup Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळला जनसागर ..
T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाकडून विराट कोहलीने ७६ (५९) आणि अक्षर पटेलने ४७ (३१) धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत केवळ 168 धावा करू शकला. गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 20 धावांत 3 बळी घेतले. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगच्या खात्यात 2-2 विकेट जमा होत्या. अशा प्रकारे भारताने अंतिम सामना 7 धावांनी जिंकला.
पहा व्हायरल व्हिडीओ.
THIS IS INDIAN CRICKET. 🇮🇳
THIS IS PEAK CINEMA. 🏆 pic.twitter.com/pBSYCeRDeY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..