Cricket Newsआयपीएल 2024

TATA IPL 2024 Schedule: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई कधी? कुठे? किती सामने खेळणार? पहा CSK चे संपूर्ण वेळापत्रक..

 TATA IPL 2024 Schedule:  बीसीसीआयने आज आयपीएलच्या 17व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. या आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यंदाचा आयपीएल हंगाम टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाचा असेल. कारण या मोसमातील कामगिरीच्या आधारे टी-२० विश्वचषक संघाची निवड केली जाईल. टी-20 विश्वचषकात संधी मिळवायची असेल तर भारतीय युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घ्यावे लागेल.
BCCI ने IPL 2024 च्या IPL वेळापत्रकाचा पहिला टप्पा आज 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर केला. यामध्ये पहिल्या तीन आठवड्यांच्या सामन्यांचा समावेश आहे. आता वेळापत्रक पाहून कोणते संघ किती सामने खेळणार आहेत हे कळेल.

या पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे आहे. किती सामने खेळले जातील याची माहिती घेऊ.

TATA IPL 2024 वेळापत्रक ( TATA IPL 2024 Schedule: ): चेन्नई सुपर किंग्जचे सामने (Fixtures of CSK)

सामना क्रमांक 1: CSKvsRCB
तारीख: 22 मार्च 2024 (PM 7:30)

स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम चेपॉक, चेन्नई (होम)

सामना क्रमांक 2: CSKvsGT
तारीख: 26 मार्च 2024 (PM 7:30)

स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम चेपॉक, चेन्नई (होम)

सामना क्रमांक 2: CSKvs DC
तारीख: 31 मार्च 2024 (PM 7:30)

स्थळ: Dr. Y.S. Rajasekhara Reddy ACA-VDCA Cricket Stadium, visakhapatnam   (Away)

सामना क्रमांक 4: CSKvsSRH
तारीख: 05 एप्रिल 2024 (PM 7:30)

स्थळ: Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad  (away)

TATA IPL 2024 Schedule: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई कधी? कुठे? किती सामने खेळणार? पहा CSK चे संपूर्ण वेळापत्रक..

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्ज फक्त सामने खेळणार असून आता यापैकी किती सामने गतवर्षीचा विजेता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्ज संघ (csk squad for TATA IPL 2024)

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), अवनीश राव अरवेली. रुतुराज गायकवाड, शेख रशीद, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी. मोईन अली (ENG), शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर (NZ), अजय मंडल, निशांत सिंधू, रचिन रवींद्र (NZ), डॅरिल मिशेल (NZ), शार्दुल ठाकूर. दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना (एसएल), सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना (एसएल), मुस्तफिझूर रहमान (बीएएन), मुकेश चौधरी.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-  जाणून घ्या, कोण आहे चेन्नई सुपर किंग चा बाप ? 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button