या 3 भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघाने गमावलेत सर्वाधि सामने, यादीमध्ये एक दिग्गज कर्णधारही सामील..!

0
15
ad

टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यावेळचे नियम वेगळे असतीलही, पण हा खेळ आजच्याइतकाच रोमांचक होता. ९० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटचा बादशहा समजला जात होता. पण जेव्हा सौरव गांगुलीने टीम इंडियाची कमान हाती घेतली तेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये भारतासाठी ही विचारसरणी बदलली कारण दादांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ भारतातच नाही तर परदेशी भूमीवरही संघाला विजय मिळवून दिला. आतापर्यंत एकूण 33 कर्णधारांनी भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी फॉरमॅटमध्ये नेतृत्व केले आहे. सध्या संघाची कमान विराट कोहलीच्या हाती आहे.

पण तुम्हाला माहित आहे का कोण असा कर्णधार आहे? ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक कसोटी सामने गमावले आहेत. नाही तर, चला या लेखात  भारतीय संघाच्या त्या 3 कर्णधारांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक सामने गमावले आहेत.

या 3 कर्णधाराच्या नेतृत्वात टीम इंडियाने गमावलेत सर्वाधिक सामने.

१- मन्सूर अली पतौडी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘मन्सूर अली पतौडी’ हे भारतीय कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक कसोटी सामने गमावले आहेत. मन्सूर अली पतौडी यांनी 1962 ते 1975 पर्यंत कसोटी फॉर्ममध्ये भारताचे नेतृत्व केले.

या 3 भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघाने गमावलेत सर्वाधि सामने, यादीमध्ये एक दिग्गज कर्णधारही सामील..!

मन्सूर अली पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 40 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 9 सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आणि 19 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आणि 12 सामने अनिर्णित राहिले. या यादीत मन्सूर अली पतौडी जरी पहिल्या क्रमांकावर असले तरी भारतीय क्रिकेटची ओळख त्याकाळी किंवा आज भारतीय क्रिकेट ज्या टप्प्यावर आहे, त्यात त्यांचे मोठे योगदान होते यात शंका नाही.

२- महेंद्रसिंग धोनी

जेव्हा जेव्हा भारताच्या दिग्गज कर्णधारांचा उल्लेख होतो तेव्हा त्या यादीत महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख होतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार असलेल्या धोनीने कसोटीतही भारताला अनेक यश मिळवून दिले. पण या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

MS Dhoni's Role Model: "मला नेहमीच त्यांच्यासारखा खेळाडू व्हायचं होत.." महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच सांगितल कोण आहे त्यांचा आदर्श, नेहमी या खेळाडूसारख व्हायचं होत..

माहीच्या कर्णधारपदाखाली टीम इंडिया 2009 मध्ये प्रथमच ICC कसोटी क्रमवारीत नंबर-1 संघ बनली होती. होय, यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मागे वळून पाहिले नाही. एमएसच्या नेतृत्वाखाली, भारताने एकूण 60 सामने खेळले, ज्यामध्ये भारताने 27 सामने जिंकले आणि 18 सामने गमावले. आणि 15 सामने अनिर्णित राहिले.

2008 ते 2014 या कालावधीत धोनीने  कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. तसेच, माहीच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधार बनण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. माही हा असा कर्णधार होता ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००९ मध्ये न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता.

3- मोहम्मद अझरुद्दीन

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दीनचे नाव पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. होय, टीम इंडियाला सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांसारखे मोठे खेळाडू देणारा कर्णधार अझरुद्दीन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अझरुद्दीनने 1990 ते 1999 दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. जिथे त्याने 47 सामन्यात भारताची कमान सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 14 सामने जिंकले आणि केवळ 14 सामने गमावले आणि 19 सामने अनिर्णित राहिले.

या 3 भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघाने गमावलेत सर्वाधि सामने, यादीमध्ये एक दिग्गज कर्णधारही सामील..!

खरं तर, अझरुद्दीन जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार होता, तेव्हा टीम सतत बदलांच्या काळातून जात होती आणि हा तो काळ होता जेव्हा टीम इंडियावर मॅच फिक्सिंगचे काळे ढग दाटून आले होते. त्यामुळे अझरुद्दीनला केवळ कर्णधारपदावरूनच दूर केले नाही तर त्याचे क्रिकेट करिअरही उद्ध्वस्त झाले होते.

तर मित्रांनो , हे होते ते 3 कर्णधार ज्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक सामने गमावले आहेत. क्रिकेटबद्दल अशीच रंजक माहिती वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…