संजू सॅमसन मालिकेतून बाहेर पडल्यामुळे या युवा खेळाडूला मिळू शकते संधी तर दुसरीकडे गोलंदाज अर्शदीप सिंह होऊ शकतो संघाचा हिस्सा, आजच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा भारतीय संघ
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची सुरवात आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबईत खेळला गेलेला पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 2 धावांच्या फरकाने जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडिया आज मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे संजू सॅमसन उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणे निश्चितच आहे. रांचीच्या राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया.
Jitesh Sharma has been added to India's squad.#cricket #teamindia #SanjuSamson pic.twitter.com/y8cRRFKfLH
— Cricket Addictor (@AddictorCricket) January 5, 2023
सलामीची जोडी- पहिला सामना जिंकलेली टीम इंडिया प्रथम मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे केवळ 1 सामन्यानंतर सलामीच्या जोडीशी छेडछाड करणे कठीण दिसते. त्यामुळे संघाला इशान आणि शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करायला आवडेल.
मिडल ऑर्डर- दीपक हुडा आणि हार्दिक पांड्या व्यतिरिक्त टीम इंडियाची मिडल ऑर्डर फ्लॉप होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संजू सॅमसनने निराशा केली. हुडाने 41 धावांची शानदार खेळी केली. आता संजू सॅमसन बाद झाल्याने त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अष्टपैलू- अक्षर पटेल पहिल्या T20 मध्ये महागात पडला होता. त्याने 3 षटकात 31 धावा दिल्या. मात्र, अखेरच्या षटकात त्याने 13 धावा देत संघाला विजय मिळवून दिला आणि हुड्डासोबत फलंदाजीत 68 धावांची भागीदारीही केली. दुसऱ्या सामन्यात संघ युजवेंद्र चहलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देऊ शकतो. चहलने 2 षटकात 26 धावा दिल्या आणि तो विकेट रहित राहिला.


अर्शदीपचे गोलंदाजीत पुनरागमन– वेगवान गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर अर्शदीप सिंग पुनरागमन करू शकतो. त्याला हर्षल पटेलच्या जागी संधी मिळू शकते, ज्याने 2 बळी घेतले पण 10.41 च्या इकॉनॉमीमध्ये 4 षटकात 41 धावा दिल्या.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी.