गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी विराजमान, 5 वर्षात तब्बल एवढ्या आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या संधी..

0

गौतम गंभीर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 9 जुलै रोजी टीम इंडियाचे नवीन प्रमुख प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली होती. गंभीर आपल्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंकेसोबत वनडे आणि टी-२० मालिकेने करणार आहे. आता गंभीरच्या कोचिंग टीम इंडियाचे आगामी सामने, मालिका आणि आयसीसी टूर्नामेंटचे वेळापत्रकही समोर आले आहे. अशा स्थितीत गंभीरसाठी पुढील वाटचाल सोपी होणार नाही.

Team India New Head Coach: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यावर पहिल्यांदाच बोलला गौतम गंभीर, केले मोठे वक्तव..

गंभीरने प्रशिक्षक पदाची धुरा हातात घेताच, टीम इंडियाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ज्यामध्ये 5 आयसीसी स्पर्धांचा देखील समावेश आहे. अर्थातच गंभीरला ह्या ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी असणार आहे.

 प्रशिक्षक झाल्यानंतर गौतम गंभीरची  पहिली प्रतिक्रिया

राहुल द्रविडचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरला नवे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीर म्हणाला की,

‘टीम इंडियात परतल्यानंतर मला खूप अभिमान वाटत आहे. भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. आता करोडो भारतीय चाहत्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी पूर्ण शक्ती वापरेन.

गंभीरच्या कार्यकाळाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

1. ODI आणि T20 मालिका (श्रीलंका 2024)
2. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियात 5 कसोटी
3. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी
4. 2025 मध्ये WTC अंतिम
5. 2025 मध्ये इंग्लंडमध्ये 5 कसोटी
6. 2026 मध्ये T20I विश्वचषक
7. 2026 मध्ये न्यूझीलंडमध्ये 2 कसोटी
8. 2027 मध्ये WTC अंतिम
9. 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक

गौतम गंभीर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी विराजमान, 5 वर्षात तब्बल एवढ्या आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या संधी..

IND vs ZIM: पहिला टी-२० सामना आज, असी असू शकते पहिल्या सामन्यासाठी यंग भारतीय टीम..!
गौतम गंभीरचे संपूर्ण लक्ष 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर असेल. टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते, तर टीम इंडियाने कधीही वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. अशा स्थितीत गंभीरला त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियासाठी ही दोन्ही आयसीसी जेतेपदे मिळवायची आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.