आयपीएल 2024 च्या सतराव्या हंगामात रविवारी
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्याच्या तयारी करत असताना दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुली आणि मुंबई इंडियन्सचे मेंटोर सचिन तेंडुलकर यांनी वानखेडे स्टेडियमवर एकमेकांशी भेट घेतले. या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देखील मिळाला. 90 च्या दशकात सचिन आणि सौरव हे भारतीय वनडे संघामध्ये सलामीला खेळत होते.
सौरव गांगुली यांनी इन्स्टा स्टोरी मध्ये सचिन तेंडुलकर सोबतचा व्हिडिओ फोटो शेअर केला आहे. त्या इन्स्टा स्टोरी एक जुना फोटो शेअर केला आहे जेव्हा ते भारतीय वन डे संघात सलामीला खेळत होते. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी instagram अकाउंट वर सचिन तेंडुलकर यांच्यासोबतचा जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात सुपरहिट फिल्म शोले यातील प्रसिद्ध गीत तेरे जैसा यार कहा हे बॅकग्राऊंड म्युझिक लावले आहे. व्हिडिओमध्ये सौरव गांगुली हे नेट्स जवळ उभे असलेल्या सचिन तेंडुलकर यांची भेट घेण्यासाठी जात आहेत.
गांगुली, सचिन यांच्याशी बोलण्यापूर्वीच आधी हस्तांदोलन करतात व परत गळाभेट घेतात. दोघे कोणत्यातरी विषयावर चर्चा करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये सौरव गांगुलीने लिहिले की, “काय खेळाडू होता. जिगरी दोस्त. पुन्हा एकदा भेटून खूप भारी वाटले. ” क्रिकेट प्रेमींना हा फोटो खूपच आवडला असून त्याच्यावर कमेंट्स देखील येत आहेत.
सध्या ते दोघेही आयपीएल मध्ये वेगवेगळ्या संघात विविध भूमिका पार पडताहेत. दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुली आणि मुंबई इंडियन्सचे मेंटोर म्हणून सचिन तेंडुलकर काम पाहत आहेत. आयपीएल मध्ये गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स नवव्या तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुले हे बरेच वर्ष क्रिकेटमध्ये सलामीला खेळत होते. दोघांमध्ये खूप घनिष्ठ मैत्री आहे. दोघांनीही क्रिकेट खेळत असताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. जगातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये सचिन आणि सौरव यांची गणणा होते. निवृत्तीनंतर सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर सचिन तेंडुलकर हे सीएसी मध्ये आपली भूमिका बजावली.
सचिन आणि सौरव यांची जोडी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी जोडी ठरली. या जोडीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला आहे. सचिन आणि सौरव यांनी 136 डावात 49 च्या सरासरी 6609 धावा केल्या आहेत. यात 21 वेळा शतकी आणि 23 अर्धशतकी भागीदारी केली आहेत.
सचिन आणि सौरव यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एडम गिलफ्रेस्ट आणि मायकल हेडन यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दोघांनी मिळून 114 डावामध्ये 5372 धावा केल्या आहेत तर तिसऱ्या स्थानावर गार्डन ग्रीनिज आणि डेमसंड हेन्स ही वेस्टइंडीजची जोडी आहे.