IPL 2024: आयपीएलचा अंतिम सामना या मैदानावर होणार; लवकरच होणार घोषणा..!

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024: आयपीएल 2024 (IPL 2024)  च्या सामन्यांना धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई आणि बंगळूर यांच्यात रंगला होता. देशात एकीकडे आयपीएलचे सामने सुरू आहेत तर दुसरीकडे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. बीसीसीआयने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले होते. उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रक अद्याप घोषित झाले नाही. प्ले ऑफ आणि आयपीएलचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळला जाणार आहे याची घोषणा अद्याप बाकी आहे.

IPL 2024: आयपीएलचा अंतिम सामना या मैदानावर होणार.

गेल्या दोन वर्षापासून आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात होता. मात्र यंदा आयपीएलचा अंतिम सामना या मैदानावर होणार नसून तो चेन्नईच्या मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएल लेटेस्ट न्यूजच्या माहितीनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक क्वालिफायर आणि एलिमिनेटरचे सामने होणार आहेत तर दुसरा क्वालिफायर सामना चेन्नई येथे होऊ शकतो.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयपीएल लेटेस्ट न्यूजशी बोलतांना सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आतापर्यंत फायनल डिफेंडिंग चॅम्पियन संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यामुळे यंदाचा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक स्टेडियम वर होऊ शकतो.

IPL 2024: आयपीएलचा अंतिम सामना या मैदानावर होणार; लवकरच होणार घोषणा..!

यापूर्वी बीसीसीआय ने 21 आयपीएलच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले होते. लवकरच bcci लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहून उर्वरित वेळापत्रक जाहीर करू शकते. मतदानाच्या तारखा आणि आयपीएल मधील सामने एकाच दिवशी येऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.