लखनऊ सुपर जायन्ट्स संघाच्या ‘या’ खेळाडूला बसला मोठा धक्का, थेट करार यादीतूनच काढले बाहेर…!

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने 2024-25 साठी करार केलेल्या खेळाडूंची यादी घोषित केली आहे. त्यात दोन मोठ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले नाही. यामध्ये नुकतेच कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती झालेला सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याचे नाव सामील आहे तर दुसरा खेळाडू म्हणजे अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याचे नाव आहे. करार केलेल्या या यादीमध्ये 4 नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर 19 खेळाडूंना करार यादीत कायम ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाने नव्या करारामध्ये केलेल्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोइनिस यांच्याशिवाय सलामीचा फलंदाज मार्कस हॅरीस फिरकिपटू एश्टन एगर, वेगवान गोलंदाज माइकल नेसर यांचे देखील नाव समावेश आहे. मार्कस स्टोइनिस याचे नाव ऐकून अनेकांना आश्चर्यचकित वाटले. सध्या तो आयपीएलच्या सतराव्या हंगामात लखनऊ सुपर जेन्ट्स संघाकडून खेळत आहे.

लखनऊ सुपर जायन्ट्स संघाच्या या खेळाडूला बसला मोठा धक्का, थेट करार यादीतूनच काढले बाहेर...!

मार्कस स्टोइनिस हा दुखापतीमुळे न्युझीलँडविरुद्धची टी-20 मालिका खेळू शकला नाही. विशेष म्हणजे येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची यादीत त्याचे नाव असू शकते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चार नव्या खेळाडूं बरोबर सेंट्रल करार केला आहे. या चारही खेळाडूंना पहिल्यांदाच करारामध्ये समाविष्ट करून घेतले आहे त्यामध्ये वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेट, मेट शॉर्ट, आरोन हार्डी आणि नाथन एलिस या खेळाडूंचा समावेश आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकूण 23 खेळाडूंना या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट केले आहे या यादीमध्ये माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, नथन लॉयन आणि पॅट कमिन्स यांचे देखील नाव समावेश आहे.

2024-25 या वर्षासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय करारामध्ये समावेश केलेल्या खेळाडूंची नावे

पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, जोश इंग्लिश, टॉड मर्फी,उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, ट्रॅव्हिस हेड, एरॉन हारडी , ॲलेक्स कॅरी, स्कॉट बोलँड, झेवियर बार्टलेट, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.