लखनऊच्या इकाना स्टेडियमवर दुपारी दोन वाजता भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध विजयी षटकार ठोकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात भारत आणि विजय मिळवला तर त्यांचे सेमी फायनलचे तिकीट पक्के होईल. तसेच इंग्लंडने आजचा सामना गमावला तर ते वर्ल्डकप मधून बाहेर पडू शकतात.
आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती प्रेस कॉन्फरन्समध्ये के एल राहुल यांनी दिली. हार्दिक पंड्या च्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. सूर्यकुमारने न्युझीलँड विरुद्धच्या सामन्यात फरशी चमक दाखवू शकला नाही तो दोन धावांवर धावा झाला. इंग्लंडचा संघ फार्मात असला तरी भारतीय संघ इंग्लंडला कमी लेखणार नसल्याची माहिती के एल राहुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन्ही संघात आतापर्यंत 106 वनडे सामने झाले आहेत. यात भारताने 57 तर इंग्लंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. 3 सामन्यांचा निकाल लागला नाही तर दोन सामने टाय झाले आहेत. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघात आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. त्यात केवळ तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला तर इंग्लंडने चार सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना टाय झाला.
2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा पराभव केला होता त्यानंतर 2007 आणि 2015 च्या विश्वचषकामध्ये भारताचा सामना झाला नाही तर 2011 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमधला सामना हा टाय झाला. 2019 मध्ये भारताचा इंग्लंडने 39 धावांनी पराभव केला होता. विश्वचषक स्पर्धेत भारताने गेल्या वीस वर्षापासून एकदाही इंग्लंडला हरवले नाही.
भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयश अय्यर हे तिघेही फलंदाज फॉर्मत आहेत. त्यामुळे या ही सामन्यात धावाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलंदाजी पोषक असलेल्या या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक असेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजापुढे खेळणे इंग्लंडच्या फलंदाजांपुढे एक मोठे आव्हान असेल.
भारताचा संभावित संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
इंग्लंडचा संभावित संघ
डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड.