हे 5 खेळाडू एकदिवशीय सामन्यात सर्वांत जास्त वेळा ‘नर्वस 90’ चे शिकार झालेत, कुणाचे २ धावांनी तर कुणाचे एक धावामुळे हुकले शतक…!
हे 5 खेळाडू एकदिवशीय सामन्यात सर्वांत जास्त वेळा ‘नर्वस 90’ चे शिकार झालेत, कुणाचे २ धावांनी तर कुणाचे एक धावामुळे हुकले शतक…!
एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारणे खूपच कठीण आणि अवघड असते हे तुम्हाला माहीतच आहे. बऱ्याच वेळा अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचे शतक थोडक्यासाठी हुकले आहे. बऱ्याच वेळा पाहिलं असेल अनेक खेळाडू 99 वर आऊट होतात. खर तर एकदिवस क्रिकेट सामन्यात खेळाडू ला सर्वात मोठे दुःख हे 99 धावांवर बाद झाल्यावर होते. आज या लेखात आम्ही आपणास अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहेत जे एकदिवसीय सामन्यात 99 धावांवर बाद झाले आहेत. या मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे.

ज्योफ्री बॉयकॉट(Geoffrey Boycott)
ज्योफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) हा इंग्लंड चा उत्कृष्ट फलंदाज आहे. सण 1974 साली पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात तो 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढील सामन्यात ते 99 धावांवर नाबाद खेळला आणि सामना जिंकला आणि नंतर च्या सुद्धा एका सामन्यात ज्योफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) 99 वर बाद झाला. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात तो 3 वेळा 99 वर बाद झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासात तो इंग्लंडचा एकमेव असा फलंदाज आहे..
सचिन तेंडूलकर (Sachin Tedulkar)
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tedulkar) हा सुद्धा या यादीत सहभागी आहे. भारताचा सर्वात जबरदस्त फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. क्रिकेट करियर मध्ये सचिन (Sachin Tedulkar) 99 वर 3 वेळा बाद झाला आहे. याच बरोबर 17 वेळा 90 ते 99 च्या दरम्यान सचिन बाद झाला आहे.
मिस्बाह उल हक (Misbah ul Huk)
एकदिवसीय सामन्यात 99 धावांवर बाद होण्याच्या बाबतीत मिसबाह तिसर्या स्थानावर आहे . आतापर्यंत मिस्बाह उल हक एकदिवसीय सामन्यात 3 वेळा 99 धावांवर बाद झाला आहे शिवाय एकवेळी 99 धावांवर नाबाद होऊन पेवेलियन मध्ये परतला आहे.
यां खेळाडू व्यतिरक्त वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehgwag), एलेक्स हेल्स (elex hales), सनथ जयसूर्या (Sanath Jausruya) आणि डीन हे खेळाडू सुद्धा एक दिवसीय सामन्यात 2 वेळा 99 वर बाद झाले आहेत.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: