लखनऊ संघाचे टेन्शन वाढले..! राजधानी एक्सप्रेस मयंक यादव याला झाली दुखापत; एकच षटक फेकून पॅवेलियनमध्ये परतला..

0
13
लखनऊ संघाचे टेन्शन वाढले..! राजधानी एक्सप्रेस मयंक यादव याला झाली दुखापत; एकच षटक फेकून पॅवेलियनमध्ये परतला..
ad

 

 मयंक यादव: आयपीएल 2024 मधील 21व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यांमध्ये लखनऊने गुजरातविरुद्ध 33 धावांनी विजय मिळवला. सामना सुरू असताना लखनऊच्या संघाला मोठा झटका बसला आहे. यंदाच्या हंगामातला सर्वात वेगवान गोलंदाज गोलंदाजाला मैदान सोडावे लागले. तसेच गोलंदाजी करताना त्याच्यात पूर्वी इतका वेग दिसून आला नाही.

वेगाचा बादशहा य lSG चा युवा तारा 'मयंक यादव' कोणाला मानतो आदर्श खेळाडू? स्वतः मयंकने केला खुलासा......

 मयंक यादव याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात झाली दुखापत..

लखनऊ सुपर जायंट्सचा मयंक यादव याला रविवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळताना दुखापत झाली. या सामन्यामध्ये त्याने केवळ एकच ओव्हर गोलंदाजी केली. त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. तो गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात परतला नाही. त्यामुळे लखनऊच्या संघाचे टेन्शन वाढले आहे. साईड ट्रेन इंजरी झाल्यामुळे तो मैदानातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.

मयंक यादव ने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या सामन्यात 156.7च्या स्पीडने गोलंदाजी केली होती. यंदाच्या हंगामातला तो सर्वात वेगवान चेंडू ठरला. पण कालच्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी झालेला दिसून आला. गुजरातच्या डावातील चौथ्या षटकात तो गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी केवळ दोनच चेंडू तो 140च्या स्पीडने फेकू शकला. षटकातील शेवटचे चेंडू तो 137च्या स्पीडने टाकत होता. हे सर्वांना हैराण करून टाकणारी बाब आहे. यासह त्याने या षटकात 13 धावा देखील दिल्या.

लखनऊ सुपर जायंट्सने मयंक यादव याला आयपीएल 2023च्या लिलावामध्ये आपल्या संघात सामील करून घेतले होते. मयंक यादव याला लिलावमध्ये वीस लाख रुपयाच्या बेस प्राईस वर लखनऊने विकत घेतले होते. यानंतर तो आयपीएल 2023 मध्ये दुखापतीमुळे बाहेर पडला होता. दुखापतीमुळे तो दिल्लीच्या रणजी संघात देखील खेळू शकला नाही. मयंक त्याच्या कारकिर्दीमध्ये टाचेच्या आणि हॅमस्टिंगच्या दुखापतीमुळे बऱ्याच सामन्यांना मुकला आहे.

लखनऊ संघाचे टेन्शन वाढले..! राजधानी एक्सप्रेस मयंक यादव याला झाली दुखापत; एकच षटक फेकून पॅवेलियनमध्ये परतला..

मयंक यादव यांच्या दुखापती विषयी अपडेट देताना कृणाल पांड्या म्हणाला की,

“मला माहीत नव्हते की मयंक यादवला काय झाले आहे, पण मी त्याच्यासोबत काही वेळ घालवला आहे. तो पुढच्या सामन्यामध्ये खेळू शकतो. ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. तो मागील हंगामात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी नेट्समध्ये चांगली गोलंदाजी करत होता. मी जितके त्याच्याशी संवाद साधला आहे, जितके त्याला पाहिले आहे यावरून तो फिट आहे असे दिसून येते. त्याचे जजमेंट खूप चांगले आहे.”

मयंक यादवने यंदाच्या हंगामामध्ये 157च्या स्पीडने गोलंदाजी करत संपूर्ण आयपीएल स्पर्धेत केवळ धाक निर्माण केला नव्हता तर दोन सामन्यांमध्ये तीन-तीन विकेट घेऊन ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून देखील त्याला निवडण्यात आले होते. जर तो पुढील काही सामन्यांमध्ये उपलब्ध झाला नाही तर लखनऊच्या संघाला मोठा झटका बसू शकतो. लखनऊचा पुढचा सामना 12 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…