कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ‘गोल्डन डक’ झालेत हे आहेत भारतीय खेळाडू, हा खेळाडू झालाय सर्वाधिक वेळा शून्यावर बाद..!

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'गोल्डन डक' झालेत हे आहेत भारतीय खेळाडू, हा खेळाडू झालाय सर्वाधिक वेळा शून्यावर बाद..!

MOST Duck In Test: क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला शून्यावर बाद होणे आवडत नाही. असे काही खेळाडू आहेत जे की त्यांच्या कारकिर्दीत मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर माघारी परतले आहेत. आज आपण त्या भारतीय खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत जे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

हे आहेत कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय खेळाडू.

1. कपिल देव (Kapil Dev)

भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देऊन जागतिक क्रिकेटमध्ये देशाचे नाव झळकवणारे अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 184 डावात 16 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. 1983 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध केलेली शतकी खेळी आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करून आहे.

2.वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag)

आक्रमक फलंदाजी करून गोलंदाजाच्या पोटात गोळा आणणारा .वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag)  हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागला 178 डावात 16 वेळा शून्य धावसंख्येवर माघारी परतावे लागले आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसून आला होता. आयपीएल मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

३.अनिल कुंबळे (Anil Kumble)

भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) 173 कसोटी डावात 17 वेळा शून्यावर बाद झाले होते. कुंबळे यांच्या नावावर एका कसोटी शतकाचे देखील नोंद आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना एका ऐतिहासिक शतकाची नोंद केली होती. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली होती,मात्र विराट कोहली याच्याशी त्यांचे सूर जुळले नसल्याने त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

4. मोहम्मद शमी(Mohmmad Shami)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(Mohmmad Shami) हा 89 कसोटी डावात एकूण 18 वेळा गोल्डन डक झाला आहे. मोहम्मद शमी हा सध्या तुफान फॉर्मात आहे. 2023 विश्वचषकांमध्ये त्याच्या  जबरदस्त परफॉर्मन्स मुळे भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. अजून चार-पाच वर्षे तो क्रिकेटमध्ये सहज खेळू शकतो. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'गोल्डन डक' झालेत हे आहेत भारतीय खेळाडू, हा खेळाडू झालाय सर्वाधिक वेळा शून्यावर बाद..!

5.जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

भारतीय वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा सांभाळणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा 51 कसोटी डावात 18 वेळा शून्यावर माघारी परतला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत शमी आणि बुमराह हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

6. हरभजन सिंग (Harbhajan Singh)

भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा 145 डावात 19 वेळा शून्य धावसंख्येवर माघारी परतला आहे. हरभजन सिंग यांच्या नावावर देखील एका शतकी खेळीची नोंद आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हे शतक ठोकले होते. हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'गोल्डन डक' झालेले हे आहेत भारतीय खेळाडू!

7. बिशन सिंग बेदी  (Bishan Bedi Singh)

भारताचे महान दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी हे कसोटी क्रिकेटमध्ये 101 डावात सर्वाधिक 20 वेळा बाद झाले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजाची भंबेरी उडवली होती. मागील वर्षी त्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले होते. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर काही काळ त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *