भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 17वा हंगाम सुरू आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे विक्रम पाहायला मिळत आहेत. काही विक्रम मोडले जात आहेत तर काही नव्याने निर्माण होत आहेत. आज आम्ही आपल्याला आयपीएल मध्ये कमी डावामध्ये 1 हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची माहिती देणार आहोत.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा माजी खेळाडू शॉन मार्श याने आयपीएलच्या इतिहासात 21 डावांमध्ये 1 हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. 2008 मध्ये त्यानेही धडाकेबाज कामगिरी केले होते शॉन मार्च नावाचा हिरा जागतिक क्रिकेटला आयपीएल मिळवून दिला आहे. प्रतिभा असूनही या खेळाडूला आपली कारकीर्द जास्त काळ गाजवता आली नाही. त्यानेच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू लेंडल सीमन्स याने 23 गावांमध्ये 1000 धावा केल्याचा विक्रम आहे. मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये तो सलामवीरची भूमिका बजावत होता. आयपीएल मध्ये धडाकेबाज कामगिरी करूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फारशी संधी भेटली नाही. सध्या तो व्यावसायिक टी-20 स्पर्धा खेळतोय.
सीएसकेचा खेळाडू मॅथ्यू हेडन याने 25 धावांमध्ये 1000 धावा केल्याची नोंद आहे. सीएसकेच्या या माजी खेळाडू ने एकदा ऑरेंज कॅप जिंकली होती. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो सध्या आयपीएलमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसून येतोय.
सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज खेळाडू जॉनी बेयरस्टो याने अवघ्या 26 डावात 1000 धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात तो याच संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मोठमोठे फटके मारण्यात माहीर असलेला हा खेळाडू चांगला परफॉर्मन्स देत नाही.
वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल याने अवघ्या 27 डावांमध्ये एक हजार धावा केल्याची नोंद होती. क्रिस गेल याने आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, केकेआर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल खेळताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.