ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whats app वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये पदार्पणाचा पहिला सामना खूप महत्त्वाचा असतो. पहिला सामना हा प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीला एक वेगळे वळण देत असतो. खेळाडू देखील पदार्पणाचा पहिला सामना गाजवण्यासाठी उत्सुक असतात. आज आपण आयपीएल मध्ये पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंची माहिती पाहणार आहोत.
या खेळाडूंनी आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार..!
1.रोब क्वीनी
रोब क्वीनी याने 2009 मध्ये आयपीएल कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पहिल्यांदा पराक्रम केला होता. मात्र या खेळाडूला आपली आयपीएल मधील किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द वाढवता आली नाही. त्यावेळी तो राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करत होता.
2.केविन कपूर
केविन कपूर याने 2012 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम केला होता. आयपीएल मध्ये खेळण्याची त्याला फारशी संधी भेटली नाही. वेस्टइंडीजचा हा युवा खेळाडू शेन वॉर्न यांचा सर्वात आवडता खेळाडू होता. आयपीएल मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
3.आंद्रे रसेल
आंद्रे रसेल याने देखील आयपीएल कारकीर्दीत पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धडाकेबाज सुरुवात केली होती. नुकतेच त्याने सर्वात कमी 97 डावात दोनशे षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएल मध्ये तो सुरुवातीपासून केकेआर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. वेस्टइंडीजचा या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूने आयपीएल मध्ये केकेआर ला महत्वपूर्ण विजय मिळवून दिले आहेत.
4.कार्लोस ब्रेथवेट
कार्लोस ब्रेथवेट याने 2016 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम केला होता. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या अष्टपैलू खेळाडूला आयपीएल मध्ये फारशी चमकदार कामगिरी सातत्याने करता आली नाही.
5.अनिकेत चौधरी
अनिकेत चौधरी याने आरसीबी संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. विराटच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला आयपीएल मधील दमदार कामगिरी करता आली नाही. त्यानंतर दिल्लीने त्याला रिलीज करून टाकले.
6.जावोन सियरलेस
जावोन सियरलेस कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. त्यानंतर हा खेळाडू पुन्हा कधी आयपीएल मध्ये खेळताना दिसून आला नाही.
7.सिद्धेश लाड
सिद्धेश लाड यांनी आयपीएल मध्ये एकमेव सामना खेळला आहे आणि या एकमेव सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. केवळ संधी न भेटल्याने प्रतिभा असूनही या खेळाडूला आपली आयपीएल कारकीर्द वाढवता आली नाही.
8. महेश तीक्षणा
श्रीलंकेचा मिस्टरी स्पिनर महेश तीक्षणा याने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर त्यानेही षटकार ठोकला होता.
9.समीर रिझवी
समीर रिझवी हा देखील या विक्रमाच्या यादीत समावेश झाला आहे. नुकतेच त्याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये हा भीम पराक्रम केला. आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.