एकही चौकार न ठोकता केवळ षटकाराच्या साह्याने धडाकेबाज मोठी खेळी करणारे हे आहेत खेळाडू!

एकही चौकार न ठोकता केवळ षटकाराच्या साह्याने धडाकेबाज मोठी खेळी करणारे हे आहेत खेळाडू!

आयपीएल मध्ये खेळाडू चौकार-षटकारांची अतिषबाजी करत एखादी मोठी इनिंग खेळून जातात आणि रातोरात स्टार होऊन त्यांचे नशीब पूर्ण बदलून जाते. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू जीव तोडून मेहनत करत असतो. असे पण काही खेळाडू आहेत ज्यांनी एक स्फोटक इथे खेळली आहे. मात्र त्यात चौकार ठोकले गेले नाहीत. केवळ षटकार ठोकूनच त्या धावा काढल्या आहेत.

1.जॉश बटलरएकही चौकार न ठोकता केवळ षटकाराच्या साह्याने धडाकेबाज मोठी खेळी करणारे हे आहेत खेळाडू

राजस्थान रॉयल्सचा जोश बटलर याने 2022 मध्ये आरसीबी विरुद्ध खेळताना 70 धावांची स्फोटक खेळी केली होती. यात सहा गगनचुंबे षटकार ठोकले होते. मात्र एकाही चौकाराचा त्यात समावेश नव्हता. इंग्लंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजने 2022 मध्ये 863 धावा करत ऑरेंज कॅप मिळवण्यात यश मिळवले.

२.नीतीश राणा

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू नीतीश राणा 2017 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना 62 धावा जोडपून काढल्या. त्यात त्याने 7 उत्तुंग असे षटकार ठोकले होते. सध्या नितीश राणा केकेआरच्या संघाकडून खेळत आहे. मागील वर्षाच्या आयपीएलमध्ये त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. यंदाच्या वर्षी देखील त्याच्यावर ही जबाबदारी पडू शकते. सध्या श्रेयश अय्यर दुखापतीने त्रस्त आहे.

३.संजू सॅमसन

राजस्थान रॉयलचा विद्यमान कर्णधार ‘संजू सॅमसन’ याने दिल्लीकडून खेळताना 2017 मध्ये गुजरात लॉयन्स विरुद्ध खेळताना 61 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. त्यात सात षटकारांचा समावेश होता. त्याची ही संस्मरणीय खेळी आजही क्रीडाप्रेमींच्या लक्षात आहे.

४.राहुल तेवतीया

डाव्या हाताने फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्स मधल्या फळीतील फलंदाज राहुल तेवतीया याने 2020 मध्ये पंजाब विरुद्ध 53 धावांची सुरेख खेळी केली होती. त्यात सात षटकार ठोकले होते. या खेळीमुळे तो अचानक प्रकाश झोतात आला.

एकही चौकार न ठोकता केवळ षटकाराच्या साह्याने धडाकेबाज मोठी खेळी करणारे हे आहेत खेळाडू!

5. डेविड मिलर

दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेविड मिलर याने 2014 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना 51 धावांची नाबाद खेळी केली होती. यात सहा उत्तुंग षटकार ठोकले होते. तो सध्या गुजरात टायटन्स संघाकडून खेळतोय.

6.जेसन होल्डर

वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना 2021 मध्ये 47 धावांची खेळी केली होती. किंग्स इलेव्हन पंजाब संघाची गोलंदाजी फोडून काढत पाच गगनचुंबी षटकार ठोकले होते.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *