आयपीएल मध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणारे हे आहेत खेळाडू

 Chennai Super Kings All Captains: ऋतुराज गायकवाड ठरला चेन्नई सुपर किंग्सचा 4 था कर्णधार, त्याआधी धोनीशिवाय या खेळाडूंनी सांभाळलय कर्णधारपद..!

आयपीएल मध्ये शेवटचे षटक हे गोलंदाज आणि फलंदाजांसाठी फार महत्त्वाचे असते. कारण या षटकातच सामन्याची दिशा ठरु शकते. आज आपण शेवटच्या षटकात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार ठोकलेत याची माहिती घेणार आहोत.

 

चेन्नई सुपर किंग्स खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने आयपीएल मध्ये विसाव्या षटकात 61 षटकार लगावले आहेत. त्याच्या इतके षटकार इतर कोणत्याच खेळाडूला मारता आले नाहीत. सीएसकेच्या संघात धोनी सहाव्या अथवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. धोनीचे यंदाचे शेवटचे आयपीएल वर्ष असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये त्याला तीन पैकी एकाच सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यात त्याने धडाकेबाज 32 धावांची खेळी केली होती.

 

वेस्टइंडीजचा धडाकेबाज माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना 33 षटकार ठोकले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये मुंबई इंडियन्सला अनेक सामने एक हाती जिंकून दिले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो मुंबई इंडियन संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी म्हणून काम पाहतोय.

 

सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा देखील विसाव्या षटकात आक्रमक खेळी करण्यात माहीर आहे. त्याने 20व्या षटकात एकूण 29 षटकार ठोकल्याची नोंद आहे. सीएसकेने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. सीएसकेच्या या विजयामध्ये रवींद्र जडेजाचा मोठा हात आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणांमध्ये तो त्याचे योगदान नेहमीच शंभर टक्के देतो.

 

 

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने 20 व्या शतकात भरभरून धावा काढल्या आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 18 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे.

आयपीएल 2024 हे दिनेश कार्तिकचे शेवटचे वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याची जगातल्या नामवंत अष्टपैलू खेळाडू मध्ये याची गणना होते. आयपीएल मध्ये तो शेवटच्या षटकामध्ये18 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मा कडून कर्णधार पद काढून घेऊन ती जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाला फारसे यश मिळाले नाही. सलग तीन सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.

 

लखनऊ संघात मधल्या फळीत खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याच्या देखील नावे 18 षटकार ठोकल्याची नोंद आहे. शेवटच्या षटकांमध्ये तो आक्रमक फलंदाजी करून संघाच्या धावसंख्येमध्ये मोलाचे योगदान देतो. डेव्हिड मिलर याने आयपीएल मध्ये पंजाब किंग्स संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *