IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील ‘हे’ नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील 'हे' नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

IPL 2024,दिल्ली कॅपिटल्स: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 2024च्या आयपीएल ऑक्शन मध्ये एकूण नऊ खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले. मागील वर्षी दिल्लीच्या संघाला प्ले ऑफ मध्ये देखील स्थान मिळवता आले नाही. यंदाच्या मोसमासाठी हा संघ जबरदस्त तयारीने मैदानात उतरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दिल्लीने यावेळी नव युवा खेळाडूंना संधी दिली आहे. त्यांच्याकडे अनुभव नसला तरी टॅलेंट मात्र जबरदस्त आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील ‘हे’ नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रुक यंदा दिल्ली कॅपिटलच्या ताब्यात सामील झाला असून मागील वर्षी तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळत होता. दिल्लीने चार कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादने मागील वर्षी त्याला 13 करोड 25 लाख रुपये देऊन खरेदी केले होते. पण त्याला म्हणावी तशी प्रभावशाली कामगिरी करता आली नाही.  

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

दिल्ली कॅपिटल्सने यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्र या अनकॅड खेळाडूला 7.20 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात सामील केले आहे. तर सुमित कुमार याला एक कोटी रुपये देऊन आपल्या संघात एन्ट्री दिली. या खेळाडूंकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव नाही मात्र त्यांच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे.

दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियन खेळाडू झाय रिचर्डसनला 5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. झाय रिचर्डसनच्या आगमनाने संघाची गोलंदाजी थोडी भक्कम झालेली दिसते. रिचर्डसन आता मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमदसारख्या भारतीय वेगवान गोलंदाजा सोबत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल.

तसेच वेस्टइंडीजचा धडाकेबाज यस्टरक्षक फलंदाज शाही होप याला 75 लाख रुपये मध्ये खरेदी केले. मागील वर्षापेक्षा यंदा दिल्लीचा संघ मजबूत वाटतोय. यंदाच्या मोसमात दिल्लीच्या संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तर त्यांना प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही.

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि पृथ्वी शॉ यांच्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी देखील मजबूत झालेली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंतदेखील पुनरागमन करणार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ मैदानात उतरणार आहे. एकंदरीतच संघ व्यवस्थापनाने दिल्लीच्या संघामध्ये समतोल राखला आहे.

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील 'हे' नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

आयपीएल ऑक्शन 2024 मध्ये दिल्लीने घेतलेले खेळाडू:

  1. स्वास्तिक चिकारा (20 लाख रुपये)

  2. शाई होप (75 लाख रुपये)

  3. सुमित कुमार (1 कोटी रुपये)

  4. झाय रिचर्डसन (5 कोटी रुपये)

  5. रसिख सलाम (20 लाख रुपये)

  6. कुमार कुशाग्र (7.20 कोटी रुपये)

  7. रिकी भुई (20 लाख रुपये)

  8. जस्टिन स्टब्स (50 लाख)

  9. हॅरी ब्रूक (4 कोटी)

IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ

पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, ऋषभ पंत, मिचेल मार्श, स्वास्तिक चिकारा, शाई होप, खलील अहमद, लुंगी एगीडी, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, सुमित कुमार, झाय रिचर्डसन, रसिख सलाम, कुमार कुशाग्र, रिकी भुई, ट्रस्टन स्टब्स, हॅरी ब्रूक, मुकेश कुमार, इशांत शर्मा, विक्की ओस्तवाल, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल, यश ढुल, ललित यादव आणि अक्षर पटेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *