मुंबई इंडियन्सने रिलीज केलेले ‘हे’ खेळाडू बनले इतर संघाचे कर्णधार; एकाने मिळवून दिले संघाला लीगचे विजेतेपद!

मुंबई इंडियन्सने रिलीज केलेले 'हे' खेळाडू बनले इतर संघाचे कर्णधार; एकाने मिळवून दिले संघाला लीगचे विजेतेपद!

मुंबई इंडियन्स: जगभरातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएल कडे पाहिले जाते. दरवर्षी एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या या लीगची क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहतात. जगातील प्रसिद्ध आयपीएल लीग सुरू होऊन 16  वर्षे पूर्ण झाले आहेत .

आत्तापर्यंत या लीगचे जेतेपद सर्वाधिक 5 वेळा मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघामध्ये कोणत्याही संघाला पराभूत करण्याची पुरेपूर क्षमता आहेत. आज आपण अशा पाच खेळाडूंची माहिती पाहणार आहोत जे की, पूर्वी मुंबई इंडियन्स मध्ये खेळाडू होते, रिलीज झाल्यानंतर ते इतर संघाचे कर्णधार झालेत.

मुंबई इंडियन्स मधून बाहेर पडलेले हे खेळाडू झाले आयपीएल संघाचे कर्णधार

 

IPL OPENING MATCH: आयपीएलचा पहिला सामना खेळण्यासाठी नेहमी चेन्नईचा दबदबा, पहा कोणत्या संघाने किती वेळा खेळलाय सुरवातीचा सामना..

 दिनेश कार्तिक: आयपीएल मधील सर्वोत्तम फर्निशर मानला जाणारा दिनेश कार्तिक सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन संघाचे प्रतिनिधित्व करत होता. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केल्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स आणि त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा सदस्य बनला. या दरम्यान त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व देखील सांभाळले. त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स बघून केकेआरने आपल्या संघात घेतले आणि त्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली.

 अजिंक्य रहाणे: भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे हा सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. त्यानंतर तो वेगवेगळ्या संघाकडून खेळत होता. दरम्यान त्याने काही काळ राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व देखील सांभाळले. मात्र कामगिरीत सातत्य नसल्यामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले. 2023 मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघामध्ये घेतले. कर्णधाराचा विश्वास सार्थ करत धमाकेदार खेळी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Glenn Maxwell (@gmaxi_32)

ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा 2013 पर्यंत मुंबई इंडियन संघाकडून खेळत होता. त्यानंतर काही रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा सदस्य बनला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याची कामगिरी पाहता किंग्स इलेव्हन पंजाब संघाने 2017 साली आपल्या संघात सामील करून घेतले. संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली, मात्र त्याला फारसे यश लाभले नाही. संघ साखळी फेरीतच बाद झाला.

मुंबई इंडियन्सने रिलीज केलेले 'हे' खेळाडू बनले इतर संघाचे कर्णधार; एकाने मिळवून दिले संघाला लीगचे विजेतेपद!

 हार्दिक पांड्या: आयपीएल मध्ये 2008 पासून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकला, त्यामध्ये सर्वाधिक योगदान हार्दिक पांड्याचे देखील होते. गुजरात टायटनच्या संघ व्यवस्थापनाने 2022 मध्ये त्याची बहारदार कामगिरी पाहता आपल्या संघात सामील करून घेतले. मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ करत त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले.

Cricket 7

येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या नव्या पर्वा ला सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षात कोणता संघ विजेता होणार याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन्स गुजरात टायटन हे संघ इतर संघाच्या मानाने तुल्यबळ दिसत आहेत. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा या तीन संघाकडे असल्यामुळे कोणताही संघ जेतेपद पटकावू शकतो.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर यांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने दोनदा तर राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एक वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IND vs ENG: आरारर.. खतरनाक! हा रेकॉर्ड बनवून आर अश्विन ठरला जगातील एकमेव खेळाडू आहे, वाचा सविस्तर.

 WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *