या खेळाडूंने आयपीएलमधून अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक: केकेआरने अनसोल्ड प्लेअरला घेतले संघात

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

आयपीएल 2024 स्पर्धेला सुरू होण्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी केकेआरच्या संघाने आपल्या संघात दोन नवे बदल केले आहेत. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय याच्या जागी फील सॉल्ट या युवा खेळाडूला संघात स्थान दिले आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. जेसन रॉय यांनी वैयक्तिक कारणांमधून आयपीएलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतल्याने केकेआर ने हा बदल केला आहे.

यष्टीरक्षक फलंदाज फील सॉल्ट याला दीड कोटी रुपये देऊन केकेआर ने आपल्या संघात दाखल करून घेतले. आयपीएल 2024 च्या लिलावात हा फलंदाज अनसोल्ड राहिला होता. तडाकेबाज फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या या युवा खेळाडूने मागील वर्षी वेस्टइंडीजच्या दौऱ्यामध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्याने टी20 मालिकेमध्ये दोन शतक ठोकले होते. त्रिनीदादच्या मैदानावर अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकले होते. टी20 क्रिकेट मध्ये इंग्लंडकडून सर्वात वेगवान शतक ठरले.

आयपीएल 2023 मध्ये सॉल्ट दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. त्याने नऊ सामन्यात 163.91 च्या सरासरीने 218 धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध त्याने  87 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. 27 वर्षीय इंग्लंडच्या खेळाडूंनी 21 आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये 639 धावा केल्या होत्या. ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

मागील वर्षी केकेआर ने जेसन रॉय याला शाकिब उल हसन याच्या जागी संघात स्थान दिले होते. त्याने 8 सामन्यात 285 धावा केल्या होत्या. 33 वर्षीय खेळाडूने 64 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1522 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या या फलंदाजाच्या नावावर आठ अर्धशतके आहेत. रॉय यांच्या आधी ॲटकिन्सनच्या रूपात बदल झाला आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला.

केकेआर चा संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार),चेतन सकारिया, मिचेल स्टार्क , अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, फिल सॉल्ट , सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, के.एस. भरत, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गस एटकिंसन, साकिब हुसैन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *