जगातील हे 3 प्रसिद्ध कर्णधार, ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकदाही शतक मारता आले नाही, जाणून घ्या.
आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळी रेकॉर्ड बनली आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त कॅच, सर्वात मोठा स्कोअर इत्यादी रेकॉर्ड तुम्ही वाचले किंवा बघितले असतील.
क्रिकेट मध्ये प्रत्येक खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे आणि आपण सर्वात जास्त हे संघाच्या कॅप्टन कडून अपेक्षित करत असतो. तसेच संघाला विजयी करण्याचे जबाबदारी सुद्धा कॅप्टन कडेच असते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या 3 जगप्रसिद्ध असलेल्या कॅप्टन ची नावे ज्यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात एकदाही शतक झळकावले नाही, तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
हीथ स्ट्रीक :-
हिथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने अनेक वर्षे आपल्या संघाचे नेतृत्वही केले आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. आक्रमक फलंदाज असून सुद्धा एकदिवसीय सामन्यात शतक मारता आले नाही.
हिथ स्ट्रीकने एकूण 189 एकदिवसीय सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये त्याने 2943 धावा केल्या 189 सामन्यांमध्ये त्याने फक्त 13 अर्धशतकेही केली होती.
डॅनियल व्हिटोरी :-
डॅनियल व्हिटोरीचे नावही तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल असेल. डॅनियल व्हिटोरीने 5 वर्षे न्यूझीलंड वनडे संघाचे नेतृत्व केले. मात्र या काळात त्याला शतकही करता आले नाही. त्याच्या वनडे कारकीर्दीत त्याने 295 वनडे सामन्यात 2253 धावा केल्या. आणि 4 अर्ध शतक सुद्धा मारले.
मिसबाह उल हक
मिसबाह-उल-हकचे नाव सुद्धा यामध्ये येते. मिसबाह ने 7 वर्षांपेक्षा जास्त काळ पाकिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. मिसबाह-उल-हकने 162 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. परंतु एकदिवसीय क्रिकेट मध्ये शतक मारता आले नाही. त्याने 42 अर्धशतके मारून आपल्या धावा चा स्कोर 5000+ वर नेला.