या 4 फलंदाजांची विकेट घेण्याची बॉलर्सची इच्छा होती, पण ते कधीच शून्यावर आऊट झाले नाहीत, भारतीय या फलंदाजाचा सुद्धा समावेश.

आपल्या देशात सर्वाधिक आवडता खेळ हा क्रिकेट आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण क्रिकेट चा चाहता आहे. क्रिकेट खेळात प्रत्येक गोलंदाजांची इच्छा असते की पहिल्याच बॉल वर फलंदाजाला आऊट करायचे. जगात असंख्य असे दिग्गज फलंदाज आहेत जे कधी ना कधी शून्य वर बाद झाले असतील.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या फलंदाजांबद्दल सांगणार आहेत जे कधीच शून्य धावांवर बाद झाला नाहीत शिवाय अनेक गोलंदाज त्यांची विकेट घेण्यासाठी तडफड करतात परंतु आजपर्यंत त्यांची विकेट घेता आली नाही.
पीटर क्रिस्टन:-
पीटर क्रिस्टन हा दक्षिण आफ्रिकेचा संघाचा माजी फलंदाज होता, त्याने 3 वर्ष दक्षिण आफ्रिका संघात काढले या सामन्याच्या दरम्यान तो एकदा सुद्धा झीरो धावांवर बाद झाला नाही. पीटर क्रिस्टन ने आपल्या क्रिकेट करियर मध्ये ४० एकदिवसीय सामने खेळले. या सामन्याच्या दरम्यान तो 6 वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. वन डे क्रिकेट मध्ये पीटर क्रिस्टन चा उच्च स्कोर हा 96 धावांचा आहे.
केप्लर वेसेल्सने:-
केप्लर हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळलेला आहे. केप्लर ने आपल्या क्रिकेट करियचा मधील 10 वर्षे एकदिवसीय क्रिकेट मध्ये घालवली आहेत. विशेष म्हणजे या 10 वर्षात तो एकदा सुद्धा शून्य धावांवर बाद झाला नाही.
जॅक रॉडलफ:-
जॅक रॉडलफ हा दक्षिण आफ्रिका संघाचा सर्वोत्कृष्ट आणि आक्रमक फलंदाज आहे, जॅक रॉडलफ ने क्रिकेट करियर मध्ये एकूण ४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यादरम्यान तो 6 वेळा नाबाद राहिला आहे. तसेच या सामन्यात त्याचा उच्च स्कोर हा 81 धावांचा आहे.
यशपाल शर्मा:-
भारतिय संघाचा माजी फलंदाज यशपाल शर्मा त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकदा सुद्धा शून्य धावांवर बाद झाला नाही. यशपाल शर्माने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 42 सामने खेळले आणि 883 धावा केल्या. वनडेमधली त्याची सर्वोत्तम स्कोर हा 89 आहे.