आयसीसी विश्वचषक 2023 च्या 32व्या सामन्यात आज बुधवारी न्यूझीलंड आणि आज बुधवारी न्यूझीलंड आणि आफ्रिका यांच्यात द.आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होईल. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मंगळवारी संघ व्यवस्थापनेने दिली. त्यामुळे संघाचे नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा टॉम लेथम याच्या खांद्यावर येऊन पडली.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्विटर हँडलवर केन विल्यम्सन खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केन विल्यम्सन मागील दोन दिवसापासून नेटस मध्ये फलंदाजीचा सराव करत होता, मात्र तो अद्यापही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होणाऱ्या सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.”
आयपीएल 2023 मध्ये खेळताना केन विल्यम्सनाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो त्या स्पर्धेतून बाहेर पडला. तसेच तो दीर्घकाळ न्यूझीलंडच्या संघाबाहेर देखील होता. दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो थेट विश्वचषक स्पर्धेतच खेळण्यासाठी उतरला.
दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामने तो खेळू शकला नाही. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये तो खेळण्यासाठी मैदानात उतरला त्याने 78 धावांची मोठी खेळी केली. हा सामना न्यूझीलंडने जिंकला. सामन्यामध्ये चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये असताना बांगलादेशच्या खेळाडूंनी फेकलेला थ्रो थेट केन विल्यम्सनच्या गुडघ्याला लागला. त्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली. त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यात तो मुकला.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी तो संघ मजबूत स्थितीत असेल. 2023 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला देखील विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सुरुवातीच्या 4 सामन्यात न्यूझीलंडने देखील बहारदार खेळ दाखवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. न्युझीलँडने आजचा सामना गमावला तर त्याचा पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला होता.