क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी पैसे न्हवते म्हणून टाकायचा दारोदारी दुधाच्या पिशव्या, आज आहे भारतीय संघाचा VIP खेळाडू
आपल्या देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेटचे वेड प्रत्येकालाच आहे. अनेक जणांना क्रिकेट मध्ये आपले करियर करायचं स्वप्न असते पण त्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणात कष्ट करण्याची तयारी आणि मेहनत याची गरज असते.

सध्या भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यांना तिथे काही सहजासहजी मिळाले नाही अथक परिश्रम करून त्यांनी क्रिकेट मध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याकडे क्रिकेट ची जर्सी घेण्यासाठी सुद्धा पैसे न्हवते, घरची गरिबी होती त्यामुळे दारोदारी दुधाच्या पिशव्या टाकून त्यातून पैसे कमवून त्याने जर्सी विकत घेतली होती.
आज भारतीय संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून रोहित शर्मा ला ओळखले जाते. हजारो लाखो फॅन्स तसेच रोहित शर्मा ला जगभरातून प्रसिद्धी मिळते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की लहानपणी रोहित शर्मा ची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. एक वेळचे जेवण कसे बसे मिळायचे त्यामुळं क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी सुद्धा रोहित शर्मा कडे पैसे नसायचे.
रोहित शर्मा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता त्यावेळी रोहित शर्मा ला क्रिकेट ची आवड होती त्यावेळी त्याने क्रिकेट किट कशी खरेदी केली याबद्दल बोललो तेव्हा तो भावूक झाला. रोहित शर्मा ने क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी दारोदारी जाऊन दुधाची पाकिटेही विकली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे आणि रोहित शर्मा 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सुद्धा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारतिय संघाने मागील वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषकही खेळला होता. परंतु त्यावेळेस भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता.