MIvsRR: लगातार 3 षटकार मारून मुंबई इंडियन्सला टीम डेव्हिडने केले विजयी, जबरदस्त षटकारांचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
MIvsRR: लगातार 3 षटकार मारून मुंबई इंडियन्सला टीम डेव्हिडने केले विजयी, जबरदस्त षटकारांचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
IPL 2023: IPL चा 1000 वा सामना प्रेक्षकांसाठी एक खास मेजवानी ठरला.राजस्थान (Rajasthan Royals) आणि मुंबई (Mumbai Indians)यांच्यात झालेल्या या हायस्कोर सामन्यापेक्षा थ्रिलर सामना आणखी बेस्ट असू शकला नसता. 1000 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)शानदार विजयाची नोंद केली.
कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 6 विकेट्सने पराभव केला या सामन्यात मुंबईसमोर 213 धावांचे आव्हान होते आणि शेवटच्या षटकात 17 धावा करायच्या होत्या. यानंतर टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात षटकारांची हॅट्ट्रिक साधत सामना जिंकला. टीम डेव्हिडचा (Tim Devid) षटकार पाहून चाहते उत्साहित झाले. सामन्यानंतर टीम डेव्हिडने आपल्या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर टीम डेव्हिड काय म्हणाला?
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा (MI) सामना विजेता टीम डेव्हिड (Tim Devid) म्हणाला की, ‘आम्हाला आज चांगल्या निकालाची गरज होती. ही एक आश्चर्यकारक भावना आहे, वानखेडेवर खेळण्यापेक्षा चांगली भावना नाही. आमच्या आत्मविश्वासासाठी, आम्ही गेल्या काही सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले नाही, मात्र आज संघाला विजयी करू शकल्यामुळे चांगले वाटतय.
जेव्हा सामना शेवटच्या षटकाकडे चालत होता तेव्हा असे वाटले की, प्रत्येकाला (गोलंदाजांना) लक्ष्य केले पाहिजे, चांगली फलंदाजीची परिस्थिती आहे आणि वैयक्तिकरित्या मला काही काळ असे काहीतरी करावेसे वाटले. घाम फुटला होता, मी खेळपट्टीवर उतरून अँगल शोधण्याचा आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा जेव्हा गोलंदाज यॉर्कर चुकवतो तेव्हा तुम्हाला संधी असते. आणि मी नेमकी तीच संधी शोधत होतो.
शेवटच्या षटकात 17 धावा करायच्या होत्या, आणि टीम डेव्हिडने (Tim Devid) चमत्कार केला…
मुंबई संघाला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. टीम डेव्हिड (Tim Devid) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) क्रीजवर होते. शेवटचे षटक टाकण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर आला. टीम डेव्हिडने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आता 5 चेंडूत 11 धावा हव्या होत्या. त्याने दुसऱ्या चेंडूवर मिड-विकेटवर षटकारही ठोकला. आता 3 चेंडूत 5 धावा हव्या होत्या. डेव्हिडने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. अशाप्रकारे मुंबईने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
या सामन्यात बर्थडे बॉय मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चालली नाही. तो पाच चेंडूत 3 धावा करून बाद झाला. त्याला संदीप शर्माने झेल देऊन क्लीन बोल्ड केले.
असा झाला सामना……
आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने 124 धावांची तुफानी खेळी केली. 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने 3 चेंडू बाकी असताना सामना जिंकला.
असे होते दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), इशान किशन (डब्ल्यूके), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल