SL vs BAN: विश्वचषकात आज श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात साखळी सामना खेळवला गेला. ज्यात क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अशी घडणा घडली, जी सर्वांच्याच चर्चेत आली आहे. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआउट होणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
विश्वचषक 2023 चा 38 वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला ,ज्यामध्ये अँजेलो मॅथ्यूजला पुढच्या चेंडूला वेळेवर सामोरे न गेल्याने टाइमआउट घोषित करण्यात आले. बांगलादेशच्या वतीने कर्णधार शकीबने टाईमआउटचे आवाहन केले होते. आणि पंचानी त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमाचे पालन करत करत अँजेलो मॅथ्यूज ला बाद दिले.
हा नियम नक्की काय आहे (What is Timed out Rule?) हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
SL vs BAN: टाईमआउट नियम काय आहे?
टाईमआउट नियम (Timed out rule) थोडक्यात आणि सहज समजून घ्यायचा झाल तर, MCC नुसार(क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था) एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर, पुढच्या फलंदाजाला 2 मिनिटांच्या आत चेंडूला सामोरे जावे लागेल, अन्यथा फलंदाजाला आऊट दिले जाते. असा सोपा अर्थ या नियमाचा आहे. असं असल तरीही हा नियम क्रिकेटमध्ये आजूनही कुणी वापरला नव्हता. म्हणजे तशी वेळच आली नव्हती. मात्र आज श्रीलंका आणि बांग्लादेश या सामण्यात हा देखील नियम वापरण्यात आला आणि श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) टाईमआउट बाद झाला.
SL vs BAN: अँजेलो मॅथ्यूजचे संपूर्ण प्रकरण काय आहे?
HISTORY IN DELHI….!!!
Angelo Mathews becomes the first cricketer in history to be out on ‘timed out’. pic.twitter.com/VRg1xmSTDf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) सोबत या सामन्यात झाले ते सहजासहजी कुणासोबत होत नाही. थोडक्यात सांगायचं झाल तर, सदीरा समराविकरामाची विकेट पडल्यानंतर तो क्रीझवर आला, पण हेल्मेटमध्ये अडचण आल्याने त्याने दुसरे हेल्मेट मागवले. मॅथ्यूजला त्याच्या पहिल्या चेंडूचा सामना दोन मिनिटामध्ये करता आला नाही . समरविक्रमाची विकेट पडल्यानंतर मॅथ्यूजला दोन मिनिटे उलटून गेली होती आणि त्याने एकही चेंडू खेळला नव्हता.
त्यामुळे विरोधी कर्णधार शाकिब अल हसनने मॅथ्यूजला टाइम आउट बाद देण्याची विनंती पंचांकडे केली. मात्र, शाकिबच्या आवाहनानंतर मॅथ्यूजने तुटलेले हेल्मेट अंपायर आणि शाकिबलाही दाखवले, त्यामुळे पहिला चेंडू खेळण्यास वेळ लागला. पण शाकिबने आपला निर्णय बदलला नाही. अशाप्रकारे मॅथ्यूज हा टाईमआऊट होणारा पहिला फलंदाज ठरला.
Angelo Mathews tried to tell Shakib Al Hasan that delay happened due to helmets, but Shakib refused to take his appeal back. pic.twitter.com/XK8v4gGbOE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
SL vs BAN: विश्वचषक 2023 स्पर्धेतून बांग्लादेश बाहेर..
बांग्लादेश याआधीच विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल पर्यंत पोहचू शकला नाहीये. शकीबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकून मोहिमेला सुरुवात केली. यानंतर संघाने सलग 6 सामने गमावले. ज्यामुळे त्याचं आव्हान संपुष्टात आले आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी