भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघ आघाडीवर आहे. सामन्यात भारतीय संघ आघाडीवर असला तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज टॉड मर्फीने सर्वांची मन जिंकली आहेत. आतापर्यंत भारतीय संघाचे ७ फलंदाज तबुंत परतले आहेत. यापैकी टॉड मर्फीने ५ फलंदाज बाद केले आहेत. ज्यामध्ये विराट कोहलीचा विकेट त्याच्यासाठी खास ठरला आहे.
सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, “विराट कोहलीचा विकेट माझा आवडता विकेट होता. तो चेंडू आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडू नसला तरी देखील हे स्वप्नं सत्यात उतरण्यासारखे आहे. तो असा खेळाडू आहे, ज्याला मी अनेक वर्षांपासून खेळताना पाहिलं आहे. तो स्टेडियममध्ये येताच आवाज होऊ लागला होता. त्याच्यासोबत खेळणं हा एक खास अनुभव आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा विराट कोहली बाद होऊन माघारी जात होता, त्यावेळी सर्वांचे चेहरे पडले होते. मला वाटतं की, मला हा विकेट नेहमीच लक्षात राहील. मला वाटत होते की, विराटच्या बॅटला चेंडू स्पर्श होऊन गेला आहे. मी मनातून हेच बोलतो होतो की, ॲलेक्स कॅरीने हा झेल सोडायला नको. त्याने देखील मला चांगली साथ दिली आणि मला विराटची विकेट मिळाली.
हे ही वाचा..
जाणून घ्या, भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋषभ पंतकडे आहे एवढी संपत्ती, वर्षाला कमवतो एवढे रुपये.