आज रात्री राजस्थान रॉयलला टक्कर देणार किंग्ज पंजाब, रॉयल चे खेळाडू आहेत सज्ज
सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल ने मॅच जिंकून आपल्या संघाला एक आत्मविश्वास प्राप्त करून दिला आहे जे की आज संध्याकाळी किंग्ज पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल मैदानात उतरणार आहे.

राजस्थान रॉयल चा यशस्वी जैसवाल तसेच इंग्लड चा जोस बटलर आणि संजू सैमसन ने अर्धशतक करून एक आपल्या संघाचा दबदबा निर्माण केल्याचे दिसत आहे. युवजेंद्र चहल ने १७ रन्स देऊन ४ विकेट्स काढल्या तर ट्रेंट बोल्ट ने २१ रन्स देऊन २ विकेट्स घेतल्या. तर किंग्ज ने मोहोली मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ला पराभूत करून तो सामना आपल्या नावे केला.
राजस्थान चे युवा खेळाडू करतायत दबदबा :-
राजस्थान रॉयल चा युवा खेळाडू यशस्वी जैसवाल ने ३७ बॉल मध्ये ५४ रन करून आपले अर्धशतक आयपीएल च्या मैदानावर झलकवले आहे तर जोस बटलर ने आपला मागच्या सत्रातील फॉर्म राखून २२ बॉल मध्ये ५४ रन काढल्या आहेत. मात्र किंग्ज पंजाब चे देवदत्त पडीकल आणि रियान पराग हे दोन्ही युवा खेळाडू मात्र लगेच आउट झाले. पण वेस्ट इंडिज चा खेळाडू शिरोमण हेटमायर ने आपल्या अदभुत खेळ दाखवत आपल्या संघाला २०० रन्स कडे घेऊन गेला.
राजस्थान रॉयल्स :-
संजू सैमसन (कर्णधार), मुरुगन अश्विन, केएम आसिफ, अब्दुल बासित, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, केस करियप्पा, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, डोनोवन फरेरा, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, कुणाल सिंह राठौर, जो रूट, ओबेद मैकॉय , देवदत्त पडिक्कल, कुलदीप यादव, एडम जम्प, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आकाश वशिष्ठ.
पंजाब किंग्स :-
शिखर धवन(कर्णधार), बलतेज सिंह, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, राज बावा,
नाथन एलिस, हरप्रीत बरार, सैम कुरेन, ऋषि धवन, हरप्रीत सिंह, वी कावेरप्पा
मोहित राठी, प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, कागिसो रबादा , भानुका राजपक्षे, एम शाहरुख खान, मैथ्यू शॉर्ट, सिकंदर रजा, अथर्व तायडे, जितेश शर्मा, शिवम सिंह, मैथ्यू शॉर्ट.