इंडियन प्रीमियर लीग 2024च्या 17व्या हंगामामध्ये महेंद्रसिंग धोनी सर्वात चर्चित खेळाडू पैकी एक आहे. कारण धोनी या हंगामामध्ये त्याच्या युवा काळातला जो लुक होता हेअर स्टाईलचा त्याच हेअर स्टाईलच्या लुक मध्ये सध्या खेळतोय. यंदाच्या हंगामातील तीन पैकी एकाच सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने 16 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
करोडो क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातले ताईत ठरलेल्या एम एस धोनीने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आजच्याच दिवशी म्हणजे 5 एप्रिल 2005 मध्ये ठोकले होते. हा सामना पाकिस्तान विरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला गेला होता. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एम एस धोनीचे शतक आणि आशिष नेहरा यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला.
या सामन्यात सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीने महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची खेळी केली. सौरवची ही चाल यशस्वी ठरली आणि जागतिक क्रिकेटला धोनीच्या रूपात एक स्टार खेळाडू मिळाला. कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरवत धोनीने अविश्वासनिय शतकी खेळी केली. 125 चेंडूत 148 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ दि मॅच’ चा अवॉर्ड मिळाला.
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने 74 धावा देत पाकिस्तानचे चार गडी बाद केले. नेहराने शाहिद आफ्रिदी, सलमान बट, युसुफ योहाना, नावेद उल हसन या खेळाडूंना बाद केले. यासह अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने आठ षटकात 55 धावा देत तीन महत्त्वपूर्ण गडी बात करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. युवराजने अब्दुल रजाक, अमीर, मोहम्मद हफीज हे तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतले होते.